agriculture news in marathi, Kharif papavida refund approved for farmers in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीकविमा परतावा मंजूर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

नांदेड ः जिल्ह्यात पंतप्रधान खरीप पीकविमा योजना २०१७ मध्ये सहभागी झालेल्या ९ लाख ६६ हजार १०७ शेतकऱ्यांपैकी ६ लाख ३ हजार ८८७ शेतकऱ्यांना मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, तीळ, ज्वारी या सात पिकांच्या नुकसानभरपाईबद्दल ४५३ कोटी ८८ लाख १८ हजार ५७७  रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला. सोयाबीनच्या नुकसानभरपाईबद्दल सर्वाधिक २ लाख ८२ हजार २४७ शेतकऱ्यांना ३५७ कोटी ६० लाख ५२ हजार ४०६ रुपये परतावा मंजूर करण्यात आला आहे.

नांदेड ः जिल्ह्यात पंतप्रधान खरीप पीकविमा योजना २०१७ मध्ये सहभागी झालेल्या ९ लाख ६६ हजार १०७ शेतकऱ्यांपैकी ६ लाख ३ हजार ८८७ शेतकऱ्यांना मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, तीळ, ज्वारी या सात पिकांच्या नुकसानभरपाईबद्दल ४५३ कोटी ८८ लाख १८ हजार ५७७  रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला. सोयाबीनच्या नुकसानभरपाईबद्दल सर्वाधिक २ लाख ८२ हजार २४७ शेतकऱ्यांना ३५७ कोटी ६० लाख ५२ हजार ४०६ रुपये परतावा मंजूर करण्यात आला आहे.

२०१७ मध्ये कृषी विभागाने पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत जनजागृती केल्यामुळे विहित मुदतीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९ लाख ६६ हजार १०७ विमा प्रस्ताव दाखल करत ३७ कोटी ५४ लाख रुपये विमा हप्ता भरणा केला होता. मूग, उडीद, तूर, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तीळ, भात, कपाशी आदी मिळून एकूण ४ लाख ५ हजार ५०० हेक्टरवरील पिकांसाठी १३८७ कोटी ८६ लाख ९५ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. गतवर्षी खरीप हंगामात जून ते आॅक्टोबर कालावधीत तब्बल ४९ दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे अल्प कालावधीत येणाऱ्या मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, तीळ आदी तसेच दीर्घ कालवधीत येणाऱ्या तूर, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु विमा कंपनीने सात पिकांच्या नुकसानीबद्दल धर्माबाद वगळता अन्य १५ तालुक्यातील ६ लाख ३ हजार ८८७ शेतकऱ्यांना ४५३ कोटी ८८ लाख रुपये विमा परतावा मंजूर केला आहे. विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या ९ लाख ६६ हजार १०७ असतांना पोटर्लवर मात्र शेतकरी संख्या ८ लाख ५३ हजार २१८ एवढी दर्शविण्यात आली आहे. याबाबत तपशीलवार माहिती घेतली जात आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

खरीप पीकविमा योजना वर्षेनिहाय सहभागी शेतकरी, विमा हप्ता, परतावा (रक्कम कोटीमध्ये)
वर्षे शेतकरी विमा हप्ता परतावा (नुकसाभरपाई)
२०१४-१५ १३९०२७ ४.७९ ७४.४४
२०१५-१६ ४७२६१७ १७.२४ २४५.५२
२०१६-१७ ७६१५५४ ३०.४८ ५०६.४९
२०१७-१८ ९६६१०७ ३७.५४ ४५३.८८
पीकनिहाय शेतकरी, लाभार्थी विमा परतावा रक्कम कोटी रुपये
पीक सहभागी शेतकरी लाभार्थी परतावा रक्कम
सोयाबीन ३६२१३६ २८२२४७ ३५७.६०५२
मूग १४१४३८ १२३३१६ ३४.७०
उडिद १५४३२२ १२२७१३ ३४.५०५१
तूर ५९१७७ ४०३९ ०.६३१ 
कापूस ६०७३९ ३९२१९ १८.१७५९
ज्वारी ६३७३६ ३११५७ ८.७८७२
तीळ १०५६६ १९६ ०.३५२
तालुकानिहाय विमा परतावा लाभार्थी शेतकरी संख्या
तालुका लाभार्थी परतावा रक्कम
नांदेड १५५३१ १.३७३३
अर्धापूर १५१७३ २.०१९१
हदगांव ६६७२३ ६८.९२८२
हिमायतनगर ६६७२३ ४.३२३८
किनवट ११४७५ ०.५३५१
माहूर ११९५२ १०.२९
भोकर १८३१० २.२२२७
मुदखे़ड ३३५१ १.२९०८
उमरी ४०९६ ०.५२२७
बिलोली २७७७६ २५.६०
देगलूर ४६१०१ ४३.८६६८
नायगांव ६७१७९ ५३.६८
मुखेड १२६२६१ १३३.९०
कंधार ९३४५७ ४८.८०३०
 लोहा ९२२६३ ५८.१११९

 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...