अकोला जिल्ह्यातील खरीप पेरणी सहा टक्क्यांनी घटली

अकोला जिल्ह्यातील खरीप पेरणी सहा टक्क्यांनी घटली
अकोला जिल्ह्यातील खरीप पेरणी सहा टक्क्यांनी घटली

अकोला : जिल्ह्यात या हंगामात सुरवातीपासून चांगला पाऊस झाला. मात्र त्यात खंड पडल्याने खरिपाची पेरणी सरासरीच्या ८४ टक्के एवढीच होऊ शकली. जिल्ह्याचे १६ टक्के क्षेत्र पेरणीशिवाय राहिले. या हंगामात ४ लाख ४९१० हेक्टरवर पेरणी झाली असून ती मागील वर्षीपेक्षा ६ टक्क्यांनी कमी आहे. यंदा शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडे अधिक राहिला. जिल्ह्याच्या खरिपाचा अंतिम अहवाल तयार झाला असून त्यातून ही माहिती समोर अाली आहे.   

जिल्ह्यात पेरणीसाठी पोषक वातावरण होते. शेतकऱ्यांनी पेरणीचे कामही पूर्ण केले होते. परंतु पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांनी पेरणी टाळली. त्यामुळे १६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली नाही. अशा कमी पेरणीचा हा दुसरा हंगाम अाहे. मागीलवर्षी ९० टक्के (४ लाख ३५ हजार ९११ हेक्टर) खरीप क्षेत्र लागवडीखाली अाले होते. यंदा ते ८४ टक्यांपर्यंत खाली अाले. या हंगामात एक लाख ४६ हजार ६८३ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. ही लागवड या पिकाच्या सरासरी क्षेत्राच्या ७२ टक्के अाहे. कापूस एक लाख ४३ हजार ८०२ हेक्टरवर पेरला गेला. त्याची क्षेत्राच्या ९४ टक्के लागवड झाली. जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र ४७ हजार ३४१ हेक्टर अाहे. मूग ३० हजार ६६५ हेक्टर, तर उडीद २३८८५ हेक्टरवर लागवड झाला होता. मूग व उडदाचे १०० टक्के क्षेत्र लागवडी खाली अाले. शेतकऱ्यांनी सोयाबीनपेक्षा कपाशीला पसंती दिली.

मागीलवर्षी इतर पिकांच्या तुलनेत कापसाला चांगला भाव मिळाला. सोयाबीनच्या दरांबाबत सातत्याने अडचणी येत होत्या. जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ७६ टक्के क्षेत्रावरच लागवड झाली. या तालुक्यात ५६ हजार ३२० हेक्टरवर पेरणी झाली होती. अकोट, बाळापूर या दोन तालुक्यांत संपूर्ण क्षेत्र लागवडीखाली अाले होते. तेल्हारा, पातूर, अकोला, बार्शीटाकळी या तालुक्यांमध्ये सरासरीच्या ८० टक्क्यांपर्यंत पेरणी झाली होती. अाता खरिपाचे रिकामे क्षेत्र रब्बीच्या लागवडी खाली येत अाहे.

पेरणी क्षेत्राची टक्केवारी आणि कंसात लागवडीचे क्षेत्र (तालुकानिहाय) अकाेट १०५ टक्के ( ७१ हजार ५५१ हेक्टर), तेल्हारा ८१ टक्के (५३ हजार ३६ हेक्टर), बाळापूर १०१ टक्के (६० हजार १६ हेक्टर), पातूर ७९ टक्के (४१हजार १२८ हेक्टर), अकाेला ८२ टक्के (८६ हजार ६२३ हेक्टर), बार्शीटाकळी  ८० टक्के (५१ हजार ५६२.६३ हेक्टर), मूर्तिजापूर   ७६ टक्के (५६ हजार ३२० हेक्टर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com