सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या

सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या
सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या

सोलापूर ः जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर मृग नक्षत्रात चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पहिले एक-दोन दिवस वगळता मृग नक्षत्रातही पाऊसच न झाल्याने ओलीअभावी खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या नाहीत. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ७९ हजार हेक्‍टर क्षेत्र निर्धारित केले आहे.

रोहिणी नक्षत्राच्या शेवटी पावसाला सुरवात झाल्यामुळे यंदाही चांगला पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना वाटू लागली होती. मात्र, रोहिणी संपल्यानंतर सुरू झालेल्या मृग नक्षत्रात पाऊसच होत नसल्याने खरिपाच्या पेरण्या सुरू होऊ शकल्या नाहीत. पेरणी होण्याइतपत ओलावा जमिनीमध्ये नसल्याने पेरणी केल्याचा फायदा होणार नाही, याची माहिती असल्याने शेतकऱ्यांनी अद्यापही खरिपाच्या पेरण्यांना सुरवात केली नाही.

जिल्ह्यात प्रामुख्याने खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, सूर्यफूल या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. पण पावसाअभावी सर्वकाही ठप्प असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४३.५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र हेक्‍टरमध्ये : उत्तर सोलापूर- ६७४७, दक्षिण सोलापूर- ४५२७, बार्शी- २४३६०, अक्कलकोट- १५५१९, मोहोळ- २७५२, माढा- २८७७, करमाळा- ४४३९, पंढरपूर- ३४३८, सांगोला- ४३८४, माळशिरस- ६५१०, मंगळवेढा- ३३८५ तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये : उत्तर सोलापूर- ५४, दक्षिण सोलापूर- ४०, बार्शी- ७०, अक्कलकोट- ५२, मोहोळ- ३६, माढा- २६, करमाळा- ४४, पंढरपूर- ५३, सांगोला- ३२, माळशिरस- ३५, मंगळवेढा- ३१, एकूण सरासरी- ४३.५३ मिलिमीटर.

बँकांकडून ठेंगाच खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख ५० हजार ५५० पैकी २१ हजार १७४ शेतकऱ्यांनाच बॅंकांकडून २८२ कोटी ८८ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. चार बॅंकांनी मात्र एकाही शेतकऱ्याला आतापर्यंत कर्ज दिलेले नाही. खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांची मशागतीची कामे सुरू आहेत. खरीप हंगामात विविध पिकांसाठी खते, बि-बियाणे, मशागतीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. गरजू शेतकऱ्यांना बॅंकांकडून अर्थसहाय व्हावे, यासाठी दरवर्षी बॅंकांना जिल्हा अग्रणी बॅंकेकडून शेतकरी व कर्ज रकमेचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. त्याचा आढावा जिल्हाधिकारी घेतात. त्यामध्ये बॅंकांना वारंवार सूचना करूनही काही बॅंकांकडून शेतकऱ्यांना ठेंगाच दाखविण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com