agriculture news in marathi, Kharif Sowing starts in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात पेरणीस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

सातारा : जिल्ह्यात माॅन्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला आहे. विशेष करून जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्‍यांत शेतकऱ्यांकडून पेरणीची कामे सुरू केली आहेत. या खरिपात सोयाबीनच्या पिकांस प्राधान्य देण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

सातारा : जिल्ह्यात माॅन्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला आहे. विशेष करून जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्‍यांत शेतकऱ्यांकडून पेरणीची कामे सुरू केली आहेत. या खरिपात सोयाबीनच्या पिकांस प्राधान्य देण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात बहुतांशी भागात माॅन्सूनपूर्व, तसेच माॅन्सून पावसाने हजेरी वेळेत लावल्याने मशागतीची कामे वेळेत सुरू झाली आहेत. जिल्ह्याच्या काही भागात वादळी पाऊस झाल्याने या ठिकाणची मशागतीची कामे लवकर उरकली आहेत. यामुळे या शेतात पेरणीची कामे सुरू झाली आहेत. चिपड्याच्या शेतात जास्त पाऊस झाला की पेरण्या करता येत नसल्यामुळे या शेतात पेरणी लवकर केली जात आहे. रविवारपासून महाबळेश्‍वर वगळता सर्व तालुक्‍यांत पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतजमीन वाफसा मिळल्याने पेरणीस प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात सोयाबीनला चांगला दर मिळेल, या आशेवर सोयाबीन पेरण्याच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. 

कृषी विभागाकडून अनुदान दिले जाणारे सोयाबीन अजून दाखल झालेले नाही. शेतकऱ्यांना कृषिसेवा केंद्रावरून बी-बियाणे, खते खरेदी सुरू केली जात असल्याने सेवा केंद्रे गजबजू लागली आहेत. सातारा, जावली, कऱ्हाड, वाई, पाटण या तालुक्‍यांत पेरणीस प्रारंभ झाला आहे. तसेच लागणीच्या भातासाठी पाटण, जावली, सातारा, महाबळेश्वर या तालुक्‍यात रोपवाटिका तयार करण्याच्याही कामांनी गती आली आहे. माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा या दुष्काळी तालुक्‍यांत पश्‍चिमेकडील तालुक्‍याच्या तुलनेत उशिरा पेरणी केली जात असल्याने या तालुक्‍यांत पेरणी कामे अल्प प्रमाणात सुरू झाली आहेत. या तालुक्‍यांत सोयाबीनसह चारा व ज्वारीसाठी खरिप ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे.

आडसाली ऊस लागवड सुरू
सातारा, कराड, वाई, पाटण, कोरेगाव, खंडाळा आदी तालुक्‍यांत आडसाली ऊस लागवड सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ऊस जावा तसेच उत्पादन चांगले मिळत असल्याने मागील पाच ते सहा वर्षांपासून आडसाली क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या आडसाली ऊस लागवड सूरू असून को-८६०३२ व एमएस १०००१ या ऊस वाणांना शेतकऱ्यांकडून सर्वाधिक पसंती दिली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...