खरिपाचा पेरा साडेसात लाख हेक्टरने वाढला

खरिप पेरणी
खरिप पेरणी

नवी दिल्ली  : यंदाच्या खरिपात सुरवातीच्या टप्प्यात रखडलेल्या पेरण्यांनी आॅगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे वेग घेतला. यंदा मागील खरिपाच्या तुलनेत साडेसात लाख हेक्टरवर अधिक पेरा झाला आहे. आतापर्यंत देशात १० कोटी ५३ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील खरिपाच्या तुलनेत यंदा ०.७ टक्के अधीक पेरणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालायने जाहीर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.  देशात यंदा खरिपाच्या सुरवातीलाच पावसाच्या ओढीने पेरण्या खोळंबल्या होत्या. काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडत होता. मात्र दमदार पावसासाठी अनेक ठिकाणी आॅगस्ट उजाडावा लागला. आॅगस्ट महिन्यात देशभरात चांगला पाऊस झाल्याने पेरण्यांनी वेग घेतला. पावसाने नदी, नाले भरून वाहिले. त्यानंतर पेरण्यांनी वेग घेतला. आतापर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत ०.७ टक्के अधिक, १० कोटी ५३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा भात लागवड मागील वर्षीच्या तुलनेत २.३ टक्क्यांनी वाढून ३८०.३३ लाख हेक्टरवर झाली आहे. तेलबिया पेरणीखालील क्षेत्रात ३ टक्क्यांनी वाढ होऊन १७७.३ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. यंदा पंजाबमध्ये पाणी उपलब्ध असल्याने आणि दराची हमी असल्याने कापूस उत्पादक भाताकडे वळले आहेत. तसेच पंजाबमधील भात मिर्ल्सनी शेतकऱ्यांना विषमुक्त भात उत्पादन घेतल्यास हमीभावावर प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपये अधीक दर देण्याचे आश्वासन दिले आहे.  जलसाठा ७५ टक्क्यांवर धरणांमध्ये पाणीसाठा वाढला. त्याचा परिणाम पेरणी जास्त होण्यावर झाला. सध्या देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये १२१.६५५ अब्ज घन मीटर पाणीसाठा आहे. एकूण क्षमतेच्या ७५ टक्के पाणी या जलाशयांमध्ये आहे. हा पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत ३१ टक्के जास्त आहे. मागील वर्षी याच काळात ४४ टक्के पाणीसाठा होता. तसेच मगील दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा १०.९ टक्के अधिक पाणीसाठा आहे.    सोयाबीनची पेरणी वाढली देशात मागील वर्षी कडधान्य दराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे यंदा अनेक भागातील कडधान्य उत्पादक तेलबिया उत्पादनाकडे वळले आहेत. यंदा कडधान्य पेरणीखालील क्षेत्र १३७ लाख हेक्टरने कमी झाले आहे. शेतकऱ्यांचा जास्त ओढा सोयाबीन पेरणीकडे राहिला आहे. देशात आतापर्यंत सोयाबीनची ११२.५० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी १०५.७६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीन पेरणीत यंदा ६.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  देशातील पीकनिहाय पेरणी (लाख हेक्टरमध्ये)

पीक  २०१८-१९ २०१७-१८
भात    ३८३.३४     ३७४.८१
कडधान्य   १३७.४० १३८.५९
भरडधान्य   १७५.४६ १८२.२३
तेलबिया  १७७.२९ १७१.९८
ऊस  ५१.९४  ४९.८६
ताग    ७.०२     ७.०९
कापूस     १२०.५६   १२०.९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com