मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटप

कर्जवाटप
कर्जवाटप

औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टाच्या ३५ टक्‍क्‍यांवरच अडकून पडले आहे. सर्वाधिक पीक कर्ज वाटपाची जबाबदारी असलेल्या व्यापारी बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या केवळ २५ टक्‍केच कर्जवाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ३५ टक्‍के तर ग्रामीण बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत ७९ टक्‍के कर्जवाटप केले आहे.  खरीप पीक कर्जवाटपासंबंधीची बॅंकांची अनास्था कर्जवाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवरून प्रकर्षाने समोर आली आहे. शिवाय शासनाकडून खरीप पीक कर्जवाटपासंधी केलेले वक्‍तव्यही हवेतच विरल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील व्यापारी बॅंकांच्या शाखांना यंदा मराठवाड्यात सर्वाधिक ८००४ कोटी ७० लाख ४१ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु, व्यापारी बॅंकांनी १८ सप्टेबरपर्यंत केवळ २५ टक्‍के कर्जवाटप करताना केवळ २००६ कोटी ३ लाख २५ हजार रुपयांचेच कर्जवाटप केले.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी २३४६ कोटी २० लाख रुपये कर्जवाटपाच्या तुलनेत ११९६ कोटी १८ लाख रुपयांचे कर्जवाटप करत ५० टक्‍केच उद्दीष्टपूर्ती केली. ग्रामीण बॅंकेला १५७६ कोटी ९४ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दीष्ट मिळाले होते. त्या तुलनेत ६२ टक्‍के कर्जवाटप करताना ९८३ कोटी ४३ लाख ८२ हजार रुपयांचे कर्जवाटप केले. मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हिंगोली व बीड जिल्ह्यात सर्वात कमी अनुक्रमे २० व २१ टक्‍के जालना जिल्ह्यात सर्वाधिक ५९ टक्‍के कर्जवाटप करण्यात आले. 

 औरंगाबाद जिल्ह्यात ४६ टक्‍के, परभणी २६ टक्‍के, लातूर ४८ टक्‍के, उस्मानाबाद ३२ टक्‍के, नांदेड जिल्ह्यात २९ टक्‍के कर्जवाटपाची उद्दीष्टपूर्ती झाली आहे. सव्वासात लाख सभासदांनाच कर्ज मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, व्यापारी बॅंक व ग्रामीण बॅंकेकडून १८ सप्टेबरपर्यंत केवळ सव्वासात लाख शेतकऱ्यांनाच खरीपाचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. कर्जवाटप झालेल्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३ लाख ८१ हजार ७७८, व्यापारी बॅंकांच्या २ लाख १० हजार ४८७ तर ग्रामीण बॅंकेच्या १ लाख ३३ हजार २६४ सभासदांचा समावेश आहे.  जिल्हानिहाय वाटप झालेले खरीप कर्ज सभासद संख्या (कोटींत)

जिल्हा     सभासद वाटप
औरंगाबाद  ७३११२ ५४३.४२
जालना   ११३९४५   ७५०.४८
परभणी ७२२७६  ३८४.४१
हिंगोली   ४३९३९ १९४.४४
लातूर   १८७२०२ ९१०.७७ 
उस्मानाबाद   ८४४६१   ४४४.६०
बीड  ७०७६०  ४६७.७४
नांदेड   ७९८३४  ४८९.७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com