agriculture news in marathi, kharip crop loan distribution status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा बॅंकेकडून ६४ टक्के पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक एप्रिलपासून पीककर्ज वाटप सुरू केले आहे. साडेचार महिन्यांत या बॅंकेने पुणे जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ५९९ सभासद शेतकऱ्यांना एक हजार ९२ कोटी ८६ लाख ८० हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या तुलनेत ६४ टक्के पीककर्ज वाटप केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १३० कोटी २६ लाख १७ हजार रुपयांनी पीककर्ज अधिक वाटप केल्याची माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक एप्रिलपासून पीककर्ज वाटप सुरू केले आहे. साडेचार महिन्यांत या बॅंकेने पुणे जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ५९९ सभासद शेतकऱ्यांना एक हजार ९२ कोटी ८६ लाख ८० हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या तुलनेत ६४ टक्के पीककर्ज वाटप केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १३० कोटी २६ लाख १७ हजार रुपयांनी पीककर्ज अधिक वाटप केल्याची माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांना खरीप हंगामात निविष्ठा खरेदीसाठी अडचणी येऊ नये, म्हणून दरवर्षी बॅंकेकडून पीककर्ज वाटप केले जाते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या जिल्ह्यात सुमारे २७२ शाखा आहेत. दरवर्षी या शाखांमार्फत सभासद शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीककर्ज वाटप केले जाते. चालू वर्षी बॅंकेचे सुमारे अडीच लाखांपर्यंत सभासद शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकरी पीककर्ज घेतात.

यंदाही या बॅंकेने सभासद शेतकऱ्यांसाठी सुमारे १६९८ कोटी ४२ लाख ७६ हजार रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. गेल्या वर्षी खरिपासाठी हेच उद्दिष्ट १५४७ कोटी ८४ लाख ५८ हजार रुपयांचे होते. त्यापैकी एक लाख ३७ हजार ६६३ सभासद शेतकऱ्यांना ९६२ कोटी ६० लाख ६९ हजार रुपये म्हणजेच ६२ टक्के पीककर्जाचे वाटप झाले होते.

बॅंकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, फळबाग, केळी, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ढोबळी मिरची, भात, ज्वारी, बाजरी, भूईमूग आदी पिकांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
सभासद शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून दिले. तीन लाख रुपयांच्या पुढे ११ टक्के व्याजदराने पीककर्ज उपलब्ध करून दिले जाते. हे पीककर्ज शेतकऱ्यांना क्षेत्राच्या प्रमाणात ठरवून दिलेल्या पिकानुसार जाते. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी पीककर्ज घेऊन पुन्हा परतफेड करतात.

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...