agriculture news in marathi, kharip crop loan distribution status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा बॅंकेकडून ५४७ कोटींचे पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018
पुणे  ः खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासू नये, यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या दीड महिन्यात उद्दिष्टाच्या १६९८ कोटी ४२ लाख ७६ हजार रुपयांपैकी ५४७ कोटी ९० लाख ९० हजार रुपये म्हणजेच ३२ टक्के पीककर्ज वाटप केले असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले. 
 
पुणे  ः खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासू नये, यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या दीड महिन्यात उद्दिष्टाच्या १६९८ कोटी ४२ लाख ७६ हजार रुपयांपैकी ५४७ कोटी ९० लाख ९० हजार रुपये म्हणजेच ३२ टक्के पीककर्ज वाटप केले असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले. 
 
गेल्या वर्षी पाच मे अखेरपर्यंत १५४७ कोटी ८४ लाख ५८ हजार रुपयांपैकी ७६ हजार १४९ सभासदांना ५६३ कोटी ६४ लाख ९२ हजार रुपये म्हणजेच३६ टक्के पीककर्जाचे वाटप केले गेले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीककर्जाच्या वाटपात चार टक्‍क्‍यांनी घट झाली असल्याचे दिसून येते. मात्र, येत्या दोन महिन्यांत कर्जवाटपात आणखी वाढ होणार आहे.
 
यंदा खरीप हंगामात सुमारे दोन लाख ३० हजार ८२६ हेक्‍टरवर विविध पिकांची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील शेतकरी भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भूईमूग, तीळ, कारळा, सुर्यफूल, सोयाबीन, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. याशिवाय, फळभाज्या, फळपीके, ऊस, फुलपिकांची लागवडदेखील होते.
 
या पिकांच्या लागवडी, पेरणी करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येतात. या अडचणीवर मात करण्यासाठी अनेक शेतकरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या तालुकास्तरीय शाखांमार्फत, गावपातळीवरील सहकारी सोसायट्यामार्फत पीककर्ज घेतात. 
 
जिल्ह्यात बॅंकेच्या जवळपास २७५ शाखा असून त्याला गावपातळीवरील सहकारी सोसायट्या जोडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बॅंकेची खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० एवढी आहे. त्यापैकी जवळपास दोन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यत शून्य टक्के व्याजदराने तर तीन लाखांच्या पुढे सहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जात आहे.
 
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, सोयाबीन, सुर्यफूल, कापूस, ऊस, हरभरा, फळबाग, भाजीपाला पिकांना पीककर्जाचा पुरवठा केला जात आहे. या कर्जातून शेतकरी खते, बियाणे खरेदी तसेच नांगरणी, वखरणी आदी कामे करतात.    

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...