agriculture news in marathi, kharip crop loan distribution status,marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ दोन टक्के पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामासाठी ९९ कोटी ८४ लाख २६ हजार रुपये म्हणजेच केवळ २ टक्‍के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाला जूनपर्यंत अपेक्षित उद्दिष्टानुसार कर्जपुरवठा करणे शक्‍य होईल का हा खरा प्रश्‍न आहे. 
 
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामासाठी ९९ कोटी ८४ लाख २६ हजार रुपये म्हणजेच केवळ २ टक्‍के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाला जूनपर्यंत अपेक्षित उद्दिष्टानुसार कर्जपुरवठा करणे शक्‍य होईल का हा खरा प्रश्‍न आहे. 
 
येत्या खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटपाच्या लक्षांकात ६७ टक्‍के कर्जवाटपाची जबाबदारी राष्ट्रीयीकृत बॅंकांवर सोपविण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी ४८३२ कोटी ५३ लाख ६० हजार रुपयांचा पीक कर्जपुरवठा करण्याचा लक्ष्यांक ठरविण्यात आला आहे.
 
त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी ११५९ कोटी ४८ लाख ७० हजार, जालना जिल्ह्यासाठी १२४३ कोटी ६० लाख ७८ हजार, परभणी जिल्ह्यासाठी १४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपये तर ९५९ कोटी रुपयांच्या पीककर्ज पुरवठ्याचा समावेश आहे. 
 
बॅंकनिहाय कर्ज वाटपाच्या लक्ष्यांक मध्ये चारही जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ८०० कोटी ६४ लाख ४२ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना ३४०१ कोटी ५८ लाख ७१ हजार रुपये तर ग्रामीण बॅंकांना ६३० कोटी ३० लाख ४७ हजार रुपये पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक  ठरविण्यात आला आहे. 
 
मिळालेल्या लक्ष्यांकनुसार औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली  जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी ६.१५ टक्‍के लक्षांकपूर्ती करत २१,३७१ शेतकऱ्यांना ४९ कोटी २२  लाख ६५ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
 
गतवर्षी जिल्हा सहकारी बॅंकांनी चारही जिल्ह्यांत याचवेळी १८६ कोटी ९२ लाख ६८ हजार रुपयांचे कर्जवाटप केले होते. दुसरीकडे व्यापारी बॅंकांनी केवळ ०.५१ टक्‍के लक्षपूर्ती करताना १५१२ सभासदांना  केवळ १७ कोटी ३६ लाख  ३३ हजार रूपयांचे कर्जवाटप केले. यातुलनेत याचवेळी गतवर्षी व्यापारी बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४४ कोटी ५५ लाख ३९ हजार रुपयांचे कर्जवाटप केले होते. 
 
ग्रामीण बॅंकांनी ५.२८ टक्‍के लक्ष्यांक पूर्ती करताना ३५०३ शेतकऱ्यांना ३३ कोटी २५ लाख २८ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. गतवर्षी ग्रामीण बॅंकांनी याचवेळी १५ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपयांचे कर्जवाटप केले होते. 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...