agriculture news in marathi, kharip crop sowing become slow due to lack of rain, nagar, maharashtra | Agrowon

खरीप पेरणी, कापूस लागवडीबाबत नगरमधील शेतकऱ्यांचा हात आखडता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी अजून आमच्या भागात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने फळबागांवर परिणाम होऊ शकतो. पेरण्यांना अडचणी येत आहेत. दुबार पेरणीच्या संकटाची शेतकऱ्यांना धास्ती आहे.
- सचिन काळे, शेतकरी, देशमुखवाडी, ता. कर्जत.

नगर  ः जिल्ह्यातील अकोले तालुका वगळता अन्य तालुक्‍यांत चार दिवासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत जोरात सुरू झालेली कापूस लागवड, पेरणीबाबत आता पुन्हा शेतकऱ्यांनी हात आखडते घेतले आहेत. पाऊस बंद झाल्याने बियाणे विक्रीवरही परिणाम झाला असून, विक्री मंदावली आहे.

पावसाळा सुरू झाला तरी गेले १५ दिवस पाऊस नव्हता. अनेक भागांत पूर्वमोसमी पाऊस झाला नाही. शिवाय चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी, कापूस लागवडीची घाई करू नये, असे कृषी विभागाने आवाहन केले होते. तसेच कापसाची उन्हाळी लागवड होणार नाही, याचीही कृषी विभागाने काळजी घेतली. परिणामी यंदा कापसाची आधी लागवड झाली नाही.

पावसाळा सुरू झाल्यावरही १५ दिवस पाऊस झाला नाही. मात्र, मागील सप्ताहात दोन दिवस झालेल्या पावसाने आणि तयार झालेल्या वातावरणामुळे कापूस लागवड, पेरणी सुरू झाली होती. खते, बियाण्यांची विक्रीही बऱ्यापैकी सुरू झाली होती. मात्र, दोन दिवसांतच पाऊस बंद झाला. आता चार दिवसांपासून अकोले तालुक्‍याचा पश्‍चिम भाग वगळता अन्य ठिकाणी पाऊस झाला नाही. त्यामुळे कापूस लागवड, पेरणीबाबत शेतकऱ्यांनी हात आखडते घेतले आहेत.

गेल्या वर्षी व त्याआधीही अनेक वेळा सुरवातीच्या पावसावर कापूस लागवड व पेरणी केल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने अनेकांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. आता पुन्हा पाच दिवस पावसांनी उघडीप दिल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. लागवड झालेले उगवेल, मात्र नंतर पाऊस आला नाही तर दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती आता पुन्हा व्यक्त होऊ लागली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लागवड, पेरणी थांबवली असल्याचे चित्र आहे.

बियाणे विक्री स्थिती (टक्के) - भात ४०, बाजरी १५, मका १०, तूर ४०, उडीद ३५, मूग ३०, सोयाबीन ६५, कापूस ५०.
 

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...