नगरमधील सात तालुक्‍यांत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यामध्ये खरिपातील पिकांचे पेरणीक्षेत्र आता सरासरीच्या जवळ आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८८.२१ टक्के पेरणी झाली आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, कोपरगाव आणि श्रीरामपूर या सात तालुक्‍यांत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे; तर नेवासा तालुक्‍यात सर्वात कमी ४२.३० टक्के पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यंदा सरासरी एवढी पेरणी होण्याची शक्‍यता आता कमी झाली आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र चार लाख २४ हजार ४९६ हेक्‍टर आहे. आतापर्यंत ३ लाख ७४ हजार ४३० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ६० हजार १८७ हेक्‍टर क्षेत्र बाजरीचे असून, एक लाख दोन हजार हेक्‍टर कापूस लागवडीचे क्षेत्र आहे. सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी बाजरीची ५४. ४१ टक्के पेरणी झाली आहे. कापसाचे क्षेत्रही यंदा कमी होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ७८.२७ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे.

भूईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तुरीच्या पेरण्यांनी सरासरी ओलांडली आहे. सरासरीच्या तुलनेत भुईमुगाची १११.५१, सोयाबीनची ११४.३३, उडीदाची २५९.६३, मुगाची १७४.५२, तुरीची ३३८.२५ टक्के पेरणी झाली आहे. भात लागवड अजूनही कमीच आहे. मकाची ८७.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप पेरणीचा कालावधी आता संपत आल्याने यंदा शंभर टक्के पेरणी होण्याची शक्‍यता कमी झाली आहे.

तालुकानिहाय पेरणीक्षेत्र हेक्‍टर (कंसात टक्केवारी) : नगर ः २३,७८७ (११९.१९),  पारनेर ः    ३६,७८२ (११२.७०),  श्रीगोंदा ः ९९९३ (२२९.५१), कर्जत ः  १५,९३८ (११५.१९), जामखेड ः ४४,८४७ (१५४.१४), शेवगाव ः २८,६८३ (६९.८४),पाथर्डी ः ५१,३९४ (८४.८३), नेवासा ः १५,६८४ (४२.३०), राहुरी ः १५,५३९ (७६.३०), संगमनेर ः ३३,७१३ (६०.८१), अकोले ः २१,५७९ ( ५८.४९), कोपरगाव ः ३१,५३५ (१०१.३६), श्रीरामपूर ः २०,१७० (१३२.१६), राहाता ः २४,६८६ (९२.४१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com