पुणे जिल्ह्यात ९३ हजार हेक्टरवर पेरणी

खरीप पेरणी
खरीप पेरणी

पुणे   ः गेल्या महिन्यात पडलेल्या पावसाचा खंडाचा चांगलाच परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्रात ५५ हजार ६०७ हेक्टरने घट झाली आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ३० हजार ८२६ हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत ९३ हजार ४१७ हेक्टरवर म्हणजेच ४१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती, कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे याच कालावधीत एक लाख ४९ हजार २१० हेक्टरवर पेरणी झाली होती. चालू वर्षी पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता होती; परंतु जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. २१ जूननंतर बऱ्यापैकी पाऊस पडण्यास सुरवात झाल्याने जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यातील शिरूर, इंदापूर, दौंड, पुरंदर, बारामती या तालुक्यांत खरीप पेरणीस सुरवात झाली होती. पश्चिम पट्ट्यातही भात लागवडीला सुरवात झाली होती. या पट्ट्यात अजूनही भात लागवडी वेगाने सुरू आहेत.    

जिल्ह्यात भाताचे ७२ हजार ९५३ हेक्टर लागवड क्षेत्र आहे. आत्तापर्यंत २१ हजार १४० हेक्टरवर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत. शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर या भागात बाजरीचे पीक घेतले जाते. जिल्ह्यात बाजरीचे जवळपास ४४ हजार ९४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आत्तापर्यत २० हजार ७७० हेक्टर म्हणजेच ४७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

शिरूर तालुक्यात मुगाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ८ हजार ६९ हेक्टर आहे. त्यापैकी दोन हजार ७०७ हेक्टर म्हणजेच ३४ टक्के क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे. पेरणीच्या वेळेस पाऊस न झाल्याने मूगाच्या क्षेत्रात घट झाली आहे. भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव, बारामती तालुक्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे.

जिल्हयात सोयाबीनचे सुमारे पाच हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १५ हजार ८८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा वेळेवर पाऊस न झाल्याने बहुतांशी शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळाल्याचे चित्र आहे.  

खरिपाची तालुकानिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)
तालुका झालेली पेरणी
हवेली १८२६
मुळशी २५५४
भोर  ७५३२
मावळ  १२२८
वेल्हा  २८८९
जुन्नर २०,३७०
खेड   १६,७७८
आंबेगाव ११,१६५
शिरूर   ७८१८
बारामती  ९२
इंदापूर  १७१७
दौंड  ३४२
पुरंदर १९,१०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com