पुणे जिल्ह्यात खरिपाची १२,७१० हेक्‍टरवर पेरणी

पेरणी
पेरणी

पुणे : गेल्या आठवड्यापासून पावसाने काही प्रमाणात जोर धरल्याने खरीप पेरण्यांना वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी पेरणीक्षेत्र दोन लाख ३० हेक्‍टर असून आतापर्यंत १२ हजार ७१० हेक्‍टरवर म्हणजेच सरासरी ६ टक्के पेरणी झाली आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, हवेली, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्‍यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे भात रोपवाटिका तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. पूर्वेकडील शिरूर, इंदापूर, बारामती, पुरंदर, दौंड तालुक्‍यांत मशागतीची कामे अंतिम टप्प्यात होती. दुसऱ्या आठवड्यात या भागात पाऊस झाला असता तर पेरण्यांना सुरवात झाली असती. पावसाचा याच कालावधीत खंड पडल्याने पेरण्या खोळंबल्याचे चित्र होते. मात्र, तिसऱ्या आठवड्यानंतर पावसास पोषक वातावरण तयार झाले तर चौथ्या आठवड्यापासून बऱ्यापैकी पावसास सुरवात झाली होती.

गेल्या आठवड्यापासून काही भागांत पाऊस पडू लागल्याने पेरण्यांना सुरवात केली आहे. सध्या खेड, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, जुन्नर, बारामती, दौंड तालुक्‍यांत पेरण्यांना बऱ्यापैकी वेग आला आहे. पश्‍चिमेकडील तालुक्‍यातही भात लागवडी सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या लागवडींना आणखी वेग येण्याची शक्‍यता आहे. बाजरी, मका, मूग, उडीद, भूईमूग, सोयाबीन या पिकांच्या पेरण्यांनी वेग घेण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.  

प्रमुख पिकांची पेरणी स्थिती (हेक्‍टर)

पीक सरासरी क्षेत्र  झालेली पेरणी
बाजरी ४४०९ ४१३०
मका ११,१८० २३६०
मूग  ८०७० १२४०
उडीद ३०६० १८०
भुईमूग ४१,४१० १३८०
सोयाबीन ५२०० ३४२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com