राज्यात गेल्या दीड दशकामध्ये गटशेतीचे मूळ बऱ्यापैकी धरले अस
ताज्या घडामोडी
पुणे ः गेले दोन आठवडे पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पेरण्यांना उशिरा सुरुवात झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत अवघ्या ९११० हेक्टरवर म्हणजेच १.२ टक्के पेरणी झाली आहे. सोलापूर, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पेरणी झाली असली तरी पुणे जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे.

१ ते २१ जून या कालावधीत सरासरीच्या तुलनेत नगरमध्ये ४४.३, पुणे जिल्ह्यात ६६.५, तर सोलापूर जिल्ह्यात ४३.० मिमी पावसाची नोंद झाली. दहा ते १९ जून यादरम्यान पावसाचा खंड पडला होता. वीस जूननंतर विभागात काही तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पेरणीस हळूहळू वेग येत आहे. पुणे विभागात खरिपातील सरासरी क्षेत्र सात लाख ८८ हजार ४८० हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे साडेसात लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा होता.
सध्या विभागातील नगर जिल्ह्यात खरिपाचे चार लाख ७८ हजार ६४० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक हजार ८७० हेक्टरवर पेरणी झाली आहे. अकोले तालुक्यात ५७९ हेक्टरवरील भात रोपवाटिकांमध्ये भात रोपे तयार असून, ७१ हेक्टरवर भात रोपांची पुनर्लागवड झाली आहे.राहुरी तालुक्यात कापसाची १८००हेक्टरवर पेरणी झाली आहे. उर्वरित तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळे पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख ४० हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सात हजार २४० हेक्टर म्हणजेच नऊ टक्के पेरणी झाली आहे.जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात बाजरी व मका; तसेच अक्कलकोट तालुक्यात तूर, मूग व उडीद पिकाची काही प्रमाणात पेरणी सुरू झाली आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
- 1 of 351
- ››