सातारा जिल्ह्यात सोयाबीनचा ४४ हजार हेक्‍टरवर पेरा

सोयाबीन
सोयाबीन

सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांची ५५.८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षीप्रमाणे खरिपात सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक ४४ हजार ७३३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्याच्या अनेक भागात गेल्या आठ दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने जूनच्या सुरवातीस पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात कृषी विभागाकडून (ऊस वगळून) दोन लाख ९०हजार ९८३ हेक्‍टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी नियोजित करण्यात आले होते, त्यापैकी एक लाख ६२ हजार ५१६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या सर्वसाधारण क्षेत्रात वाढ करण्यात आली असून, जिल्ह्यात ५३ हजार ७५० सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र नियोजित होते. सध्या सोयाबीनची ४४ हजार ७३३ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ८३.२२ टक्के पेरणी झाली आहे.

बाजरीचे ४९ हजार ५३१ हेक्‍टर क्षेत्र नियोजित होते. बाजरीची ३१ हजार ५४३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीचे २६ हजार ९४५ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी १८ हजार १४० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे १५ हजार ८४४ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, मक्‍याची ९ हजार ७१८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भुईमूग शेंगांचे ४० हजार ४३० हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी २१ हजार ४०३ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

भाताचे ५० हजार ८०५ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी १३ हजार १३१ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. दमदार पाऊस झाल्याने भात लागवडीस प्रारंभ झाला आहे. आडसाली ऊस लागवड सुरू असून, नऊ हजार ६५ हेक्‍टर क्षेत्रावर या उसाची लागवड झाली आहे. सध्या जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पेरणी कामे थांबली आहेत. वाफसा आल्यावर पुन्हा पेरणीस वेग येणार आहे.   

तालुकानिहाय झालेली पेरणी (हेक्‍टर)
 सातारा   २९,४३५
 जावळी ३,६३७
पाटण  २९,५३९
कऱ्हाड ३२,५९८
 कोरेगाव  १४,०५९
खटाव  १२,७९६
 माण २२,०८१
फलटण ६,७३०
खंडाळा  ६,२२४
 वाई   ४,९१३
महाबळेश्वर   ५०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com