सातारा जिल्ह्यात ९१ टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यात खरीप हंगामात ऊस वगळून ९१.२१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सोयाबीनची पिकाला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जिल्ह्यात कृषी विभागाकडून (ऊस वगळून) दोन लाख ९० हजार ९८३ हेक्‍टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी नियोजित करण्यात आले होते. त्यापैकी दोन लाख ६५ हजार ४१६ हेक्‍टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी झाली आहे. यात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. या हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ५३ हजार ७५० हेक्टर नियोजित होते. सोयाबीनची सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त म्हणजेच ५९ हजार ५८५ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ११०.८६ टक्के पेरणी झाली  आहे.

बाजरीचे सरासरी ४९ हजार ५३१ हेक्‍टर क्षेत्र नियोजित होते. बाजरीची ४८ हजार ४५२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीचे २६ हजार ९४५ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी २१ हजार ५९१  हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

मक्‍याचे १५ हजार ८४४ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, मक्‍याची १६ हजार ३७८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भुईमूग शेंगांचे ४० हजार ४३० हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी ३१ हजार ४४६ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. भाताचे ५० हजार ८०५ हेक्‍टर सर्वसाधारण लागवड क्षेत्र असून, त्यापैकी ३२ हजार ८११ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यात भात लागवडीस वेग आला आहे.

तालुकानिहाय पेरणी (हेक्‍टर)
सातारा  ३३,८६६
जावळी १२,१०४
पाटण ४६,४९०
कऱ्हाड  ४५,८५७
कोरेगाव २३,१७१
खटाव ३७,८३६
माण   २८,५७५
फलटण  १०,४५८
खंडाळा ११,२२८
वाई १२,१८१
महाबळेश्वर ३६५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com