सातारा जिल्ह्यात खरिपाची ३० टक्के पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : दमदार पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता. २७) २९.७६ टक्के पेरणी झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती सोयाबीन पिकाला दिल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मॉन्सून वेळेत दाखल झाल्याने पेरणीची कामे वेळेत सुरू झाली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली परिणामी पेरण्याचा काहीसा वेग मंदवला होता. जिल्ह्यात बुधवार अखेर २९.७६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरिपाचे सुमारे दोन लाख २९ हजार ९८३ हेक्‍टर (ऊस वगळून) क्षेत्र नियोजित आहे. यापैकी बुधवारअखेर ८६ हजार ५९१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य सोयाबीन पिकास देण्यात आले आहे. सोयाबीनचे ५३ हजार ७५० हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, यापैकी २४ हजार ८६६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

बाजरीचे ४९ हजार ५३१ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, १६ हजार ४३३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणीची कामे उरकली आहेत. भुईमूग शेंगांचे ४० हजार ४३० हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, यापैकी १४ हजार ६७२ हेक्‍टर क्षेत्रावर परेणी झाली आहे. खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ९४५ हेक्‍टर असून, त्यापैकी ११ हजार ९९३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भाताचे सर्वसाधारण  क्षेत्र ५० हजार ८०५ हेक्‍टर असून, त्यापैकी ११ हजार ४९ हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे.

सध्या पावसाचे प्रमाण वाढले असल्याने भात लागवडीस वेग येणार आहे. जिल्ह्यात पाटण तालुक्‍यात पेरणीची कामे सर्वाधिक प्रमाणात झाली आहेत. त्यानंतर कऱ्हाड, सातारा, माण तालुक्‍यांत पेरण्या झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com