agriculture news in marathi, kharip crop sowing status in state, pune, maharashtra | Agrowon

राज्यात खरिपात ९४ टक्के पेरा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पावसाअभावी काही तालुक्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. गेल्या काही दिवासांपासून राज्यभर दमदार पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच या पावसामुळे आगामी रबी हंगामासाठीदेखील पोषक वातावरण तयार झाल्याचे दिसत आहे. पावसामुळे पिकांवरील कीड रोगांना देखील नैसर्गिकरित्या काही प्रमाणात अटकाव बसेल.
- सच्चिंद्र प्रताप सिंह,  कृषी आयुक्त

पुणे   : राज्यभरात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपावर आलेले मळभ दूर झाले आहे. आतापर्यंत ९४ टक्के पेरा झाला असून, आता केवळ धानाच्या पुनर्लागवडीची कामे राज्यात सुरू आहेत.

राज्यातील ३० तालुक्यांमध्ये ऑगस्टच्या पंधरवड्यापर्यंत अपेक्षित पाऊस नव्हता. त्यामुळे काही भागातील पिके जळू लागली होती. पावसाअभावी कीडरोगाच्या प्रसाराला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपावरील संभाव्य संकटाची तीव्रता कमी झाल्याचे मानले जात आहे.

राज्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील १४० लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास १३३ लाख हेक्टरवर पेरा पूर्ण केला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा १३८ लाख हेक्टरच्या आसपास झालेला होता. जुनच्या अखेरीस पावसाचा खंड पडल्यामुळे यंदा पेरण्या काही भागात रेंगाळल्या. त्यानंतर पुन्हा वाढीच्या अवस्थेला पूरक ठरणारा पाऊस गेल्या काही दिवसांपासून झाला नव्हता.
आता मात्र पिके संकटातून बाहेर आली आहेत, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्यातील खरीप पेरण्यांचा कल पाहिल्यास सोयबीनच्या पेऱ्यात चांगली वाढ झाली आहे. मात्र, कपाशीचा पेरा गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५.५३ लाख हेक्टर आहे. गेल्या हंगामात पेरा ३८ लाख हेक्टरच्या आसपास होता. यंदा मात्र सोयाबीनचा पेरा ३९ लाख हेक्टरपर्यंत झाला आहे.

कपाशीचे सरासरी क्षेत्र ४२ लाख हेक्टर असताना यंदा पेरा ४० लाख ६२ हजार हेक्टरवर स्थिरावला आहे. कडधान्याचा पेरादेखील काही प्रमाणात यंदा कमी झाला आहे. कडधान्याचे राज्याचे सरासरी क्षेत्र २०.५४ लाख हेक्टरचे असून, गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी याच कालावधीत २२.५६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा केला होता. यंदा आतापर्यंत २० लाख २८ हजार हेक्टरच्या आसपास कडधान्यांचा पेरा झाला आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
शेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...