बुलडाण्यात खरिपाची सहा लाख ९८ हजार हेक्टरवर पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा : जिल्ह्यात या खरीप हंगामात अातापर्यंत असमतोल स्वरूपात पाऊस झाल्याचा फटका पेरण्यांनाही बसला अाहे. जुलै महिना संपायला अाला तरी जिल्ह्यात खरिपाचे संपूर्ण क्षेत्र अद्यापही लागवडीखाली अालेले नाही. जिल्ह्याच्या सरासरी क्षेत्रापैकी सहा टक्के क्षेत्र सध्या पेरणीविना राहिले अाहे. येत्या अाठवडाभरात पेरण्या पूर्ण होतील असा अंदाज वर्तविला जात अाहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ४८ हजार ८०० हेक्टर आहे. त्या तुलनेत अाजवर ६ लाख ९८ हजार ५६२ हेक्टरवर म्हणजेच सरासरीच्या ९३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

वऱ्हाडात बुलडाणा जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र सर्वाधिक अाहे. याही जिल्ह्यात सोयाबीन पिकास अधिक प्राधान्य असते. यंदाही सुमारे तीन लाख ८४ हजार ५९१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली अाहे. सरासरी दोन लाख ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १८५ टक्के हे लागवड क्षेत्र झालेले अाहे. कपाशी, मूग, उडीद या प्रमुख तीन पिकांचे लागवड क्षेत्र घटलेले असून, तुरीच्या लागवडीत मात्र वाढ झाली अाहे.

जिल्ह्यात तुरीची अातापर्यंत ७८ हजार १६१ हेक्टरवर लागवड झाली. तुरीचे सरासरी क्षेत्र ६५,०३५ हेक्टर अाहे. त्यातुलनेत १३ हजार हेक्टरने तुरीची लागवड वाढली. जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या कपाशीचे क्षेत्रही घटले अाहे. सरासरी २ लाख ४४ हजार ४३० हेक्टरच्या तुलनेत १ लाख ७२ हजार ५७ हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे.

अनियमित स्वरूपात पाऊस झाला. परिणामी, पेरणीचा कालावधी वाढल्याने मूग, उडीद या दोन्ही पिकांच्या लागवडीला फटका बसला. जूनमध्ये चांगला पाऊस झाला असता तर शेतकरी मूग, उडदाकडे वळाले असते. मात्र अनियमित पावसामुळे मुगाची पेरणी सरासरी क्षेत्राच्या (५२,४८० हेक्टर) सुमारे ३४ हजार हेक्टरने घटत अवघी १७, ७२५ हेक्टरवर झाली. उडदाचीही सरासरी ४८,४२० हेक्टरच्या तुलनेत अवघी ४१ टक्के म्हणजे २० हजार ७० हेक्टरवर पेरणी झाली. सुमारे २८ हजार हेक्टर उडदाचे क्षेत्र घटले अाहे. मूग व उडदाचे मिळून एक लाख ९०० हेक्टर हे सरासरी क्षेत्र अाहे. प्रत्यक्षात   फक्त ३८ हजार हेक्टरवर लागवड झालेली अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com