नगर जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीला थोडा पाऊस झाला. त्यानंतर पाऊस झाला नाही. पेरण्या केलेल्या असल्या तरी पिके कशी जगवावीत, याची शेतकऱ्यांना चिंता आहे. अजून काही दिवस पाऊस झाला नाही तर पिके वाया जाण्याची शक्‍यता आहे. पाऊस नसल्याने प्रत्येक शेतकरी काळजीत आहे. - राजेंद्र पवार, रुईगव्हाण, ता. कर्जत.
पावसाअभावी पिके संकटात
पावसाअभावी पिके संकटात

नगर   ः जिल्ह्यात गेल्या २० ते २२ दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे चार लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके अडचणीत आली आहेत. पाऊस नसल्याने खरीप पिकांची वाढ खुटली आहे. त्याचा थेट फटका उत्पादनाला बसणार असल्याचे दिसत आहे. अजून आठ दिवस पाऊस झाला नाही, तर बऱ्याच ठिकाणी पिके वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यामध्ये खरिपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख २४ हजार ४९६ हेक्‍टर असून, त्यापैकी यंदा ३ लाख ७४ हजार ४३० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरिपात कापूस, भात, बाजरी, तूर, मूग, उडदासोबत सोयाबीनचे क्षेत्र महत्त्वाचे असते. मुळात यंदा पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी अकोल्यातील आदिवासी, डोंगराळ भाग वगळता जिल्ह्याच्या कोणत्याही भागात जोरदार पाऊस झाला नाही. पावसाअभावी सुरवातीच्या काळात पेरण्यांना फारसा वेग आला नव्हता, मात्र पेरण्याचा कालावधी संपत आल्याने शेतकऱ्यांनी अल्प पावसावरच पेरण्या उरकल्या. पेरलेले उगवले खरे, मात्र आता तब्बल २० ते २२ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने आता पिके धोक्‍यात आली आहेत.

जामखेड, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, नगर तालुक्‍यात बहुतांश पिके पावसावरच अवलंबून आहेत. आता पेरलेली पिके पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. विशेषतः ऊस, डाळिंब, चारापिके यांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने खरिपामध्ये तूर व सोयाबीन या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. यंदाही सरासरीच्या पुढे पेरणी झाली आहे. मात्र पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. अजून आठ दिवस पाऊस झाला नाही तर बाजरी, कापूस, मूग, तूर, सोयाबीन, उडदाला सर्वाधिक फटका बसणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com