agriculture news in marathi, Kharip Facing problem in Sinnar taluka, | Agrowon

सिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी संकटात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

सिन्नर, जि. नाशिक : पावसाळा सपंत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाचे पीक वाया गेले आहे. पाण्याअभावी करपून चालेल्या पिकात जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र आहे. बळिराजाला पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.

सिन्नर, जि. नाशिक : पावसाळा सपंत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाचे पीक वाया गेले आहे. पाण्याअभावी करपून चालेल्या पिकात जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र आहे. बळिराजाला पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.

सिन्नर तालुका अवर्षणग्रस्त. त्यात पूर्व भाग दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. नदी व पाण्याचा स्रोत नसल्याने येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतो. पावसाळ्यात बाजरी व कडधान्ये अशी पिके घेतली जातात. गेल्या चार वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. खरिपावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. यावर्षी पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या; मात्र पावसाअभावी पीक करपून चालले आहे.
बाजरी, मका, सोयाबीन व कडधान्याची पिके कोमेजून गेली आहेत. महागडी बियाणे पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढले किंवा नातेवाइकांकडून हातउसने पैसे घेतले. शिवाय त्यांचे कष्टही वाया गेले. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची स्थिती बिकट आहे. आगामी महिनाभराच्या काळात पाऊस झाला तरी खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणे शक्य नाही.

सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना अन्य तालुक्यांतून चारा विकत आणावा लागत आहे. खरिपाचे पीक गेले तरी जनावरांना वाचविणे महत्त्वाचे असल्याने शेतकरी मिळेल ते पर्याय निवडताना दिसत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आहे, उर्वरित काळ कसा जाईल, या चिंतेत शेतकरी आहे.

टॅँकरद्वारे पाणीपुरवठा
तालुक्यात टॅँकरची मागणी वाढतच आहे. सध्या तालुक्यातील ११ गावे, ५७  वाड्या-वस्त्यांवर १३ टॅँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. निऱ्हाळे-फत्तेपूर, खापराळे, फुलेनगर, पाटपिंपरी, सोनारी, बारागावपिंप्री, आडवाडी, पांगरी खुर्द, घोटेवाडी, पिंपळे, सायाळे, गुळवंच, फर्दापूर, जयप्रकाशनगर या ठिकाणी दहा खासगी व तीन शासकीय टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

रब्बीच्या हंगामाची चिंता
तालुक्याच्या पूर्व भागातच नव्हे, तर तालुक्यात सर्वत्र खरिपाचे पीक वाया गेल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. ते करपून चालले आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम कसा घ्यावा, असा प्रश्न आहे.

इतर बातम्या
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
दिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...
खैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...
केन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
नाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...
दसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...