agriculture news in marathi, kharip planning meeting, akola, maharashtra | Agrowon

कृषी महोत्सव, श्रेयनामावलीच्या मुद्यावरून आढावा बैठकीत घमासान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018
 अकोला : जिल्हा कृषी महोत्सवाला झालेला विलंब, वनविभागाकडून गाळ घेऊन जाणाऱ्या वाहनांची अडवणूक, गेल्या हंगामात कृषी विभागाने बोगस बियाणे, खत विक्रीसाठी केलेली कारवाई, लोकप्रतिनिधींबाबत असलेली श्रेयनामावली (डेकोरम) न पाळणे या मुद्यावर खरीप अाढावा बैठकीत घमासान चर्चा झाली. 
 
 अकोला : जिल्हा कृषी महोत्सवाला झालेला विलंब, वनविभागाकडून गाळ घेऊन जाणाऱ्या वाहनांची अडवणूक, गेल्या हंगामात कृषी विभागाने बोगस बियाणे, खत विक्रीसाठी केलेली कारवाई, लोकप्रतिनिधींबाबत असलेली श्रेयनामावली (डेकोरम) न पाळणे या मुद्यावर खरीप अाढावा बैठकीत घमासान चर्चा झाली. 
 
अकोला येथे खरीप हंगाम आढावा बैठकीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन करण्यात आले. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोदे, अामदार हरीश पिंपळे, अामदार गोपिकिशन बाजोरीया, जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम उपस्थित होते. 
 
बैठकीत गेल्या महिन्यात अायोजित करण्यात अालेल्या कृषी महोत्सवाच्या अायोजनावरून अामदार पिंपळे, अामदार बाजोरीया यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. यामध्ये प्रामुख्याने या कृषी महोत्सवाच्या अायोजनातून नेमके काय साध्य झाले, किती शेतकऱ्यांना महोत्सवाचा फायदा झाला, कुठले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले गेले, रखरखत्या उन्हात महोत्सव घेण्यामागील कारण काय, अायोजनास विलंब का झाला, अशा विविध प्रश्नांनी सभागृहात अधिकारी घामाघूम झाले. यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने अधिकाऱ्यांना देता अाली नाहीत. पालकमंत्री डॉ. पाटील यांनीसुद्धा नाराजीचा सूर मांडत अायोजनासाठी निधी येऊनही विलंब होण्याचे कारण काय याबाबत विचारणा केली. 
 
अामदार बाजोरीया यांनी लोकप्रतिनिधीबाबत असलेला ‘डेकोरम’ नियोजन करताना पाळला नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत थेट निमंत्रण पत्रिकाच सादर केली. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोदे यांनी निमंत्रण पत्रिकेत अापले साधे नावही नसल्याची बाब पालकमंत्र्यांकडे मांडली. चुकीच्या नियोजनाबाबत चौकशीला तुम्हाला सामोरे जावे लागेल असा इशाराच डॉ. पाटील यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनीही यापुढे कुणी अशी चूक केली तर कारवाई करू असे सांगितले. 
 
वन विभागाच्या जागेतून गाळ नेणारी वाहने अडविली जाणे, प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात लागवड केलेली पिके उद्‌ध्वस्त करणे हेही मुद्दे प्रामुख्याने गाजले. गेल्यावेळी बोगस बियाणे व खते विक्रीचे प्रकार झाले. हा प्रकार वर्षभरापासून सुरू असताना कारवाईला विलंब होण्याचे कारण काय असेही लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांना विचारले. या हंगामासाठी धडक कारवाईचे नियोजन केले जावे असे निर्देश देण्यात अाले. पेरणीपूर्वी अारोग्य पत्रिकांचे वाटप झालेच पाहिजे, त्यासाठी हव्या त्या उपाययोजना करा असे पालकमंत्र्यांनी सुचविले. यावेळी श्री. निकम यांनी खरीप हंगाम नियोजनाचे सादरीकरण करीत माहिती दिली. 

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...