agriculture news in marathi, kharip planning meeting, gadchiroli, maharashtra | Agrowon

गडचिरोलीत धानाची दोन लाख हेक्‍टरवर लागवड होण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 एप्रिल 2018
गडचिरोली : येत्या खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्‍टरवर धानाची लागवड होण्याचा अंदाज असून, त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम आढावा बैठकीत देण्यात आली. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच खरीप आढावा बैठक पालकमंत्री अम्ब्ररीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, कृषी सहसंचालक अर्चना कडू उपस्थित होते.
 
गडचिरोली : येत्या खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्‍टरवर धानाची लागवड होण्याचा अंदाज असून, त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम आढावा बैठकीत देण्यात आली. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच खरीप आढावा बैठक पालकमंत्री अम्ब्ररीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, कृषी सहसंचालक अर्चना कडू उपस्थित होते.
 
बॅंकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून दयावे. त्यामुळे शेतकऱ्यांवर सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ येणार नाही. याबाबत बॅंकांनी दक्ष राहण्याचे निर्देश पालकमंत्री आत्राम यांनी दिले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावी, अशा सुचना खासदार अशोक नेते यांनी दिल्या. 
 
सर्व बॅंकांना मिळून ८५ कोटी १७ लाख २७ हजार रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षी एक लाख ८२ हजार हेक्‍टरवर धानाची लागवड झाली होती. या वर्षी दोन लाख हेक्‍टरवर धान लागवड होईल. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीनचे क्षेत्र पाच हजार ६४६ हेक्‍टर असले, तरी यावर्षीच्या हंगामात ते कमी होण्याचा अंदाज असल्याचे सांगण्यात आले.
 
मागील वर्षी केवळ ३९३ हेक्‍टरवर सोयाबीन लागवड होती. कापसाचे क्षेत्र वाढत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. मागील वर्षी सुमारे १४ हजार ४६१ हेक्‍टरवर कापूस होता. या वर्षी १५ हजार हेक्‍टरवर हे क्षेत्र पोचेल. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली व सिरोंचा तालुक्‍यातील ५० गावांतील २९६ आदिवासी शेतकऱ्यांना परसबाग योजनेचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...
जळगावात भाजीपाला आवकेत घटजळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
पुणे जिल्ह्यात २२० हेक्टरवर भातपीक...पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी...
टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे...पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी...
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...