agriculture news in marathi, kharip planning meeting, nagar, maharashtra | Agrowon

खते, बियाणे कमी पडणार नाहीत याची काळजी घ्या : राम शिंदे
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 एप्रिल 2018

नगर  ः खरीप हंगामात खते, बियाणे कमी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन बोंड अळीसंदर्भात मार्गदर्शन करावे. जमीन आरोग्य पत्रिकांनुसार शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या आणि नसलेल्या घटकाची माहिती द्यावी, असे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी तक्रारीही केल्या.

नगर  ः खरीप हंगामात खते, बियाणे कमी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन बोंड अळीसंदर्भात मार्गदर्शन करावे. जमीन आरोग्य पत्रिकांनुसार शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या आणि नसलेल्या घटकाची माहिती द्यावी, असे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी तक्रारीही केल्या.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता.२१) खरीप हंगाम आढावा बैठक झाली. खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार विजय औटी, भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अजय फटांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, विभागीय कृषी संचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी आर. के. गायकवाड, भाऊसाहेब बोऱ्हाळे, तंत्र अधिकारी अशोक संसारे आदी या वेळी उपस्थित होते.

आढाव बैठकीत प्रारंभी कृषी विभागाने खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाची तसेच बियाणे, खते यांच्या मागणीसंदर्भात लोणारे यांनी माहिती दिली. जलयुक्त शिवार अभियान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कांदाचाळ, फळबाग लागवड, पीकविमा, कृषी औजारे, बोंड अळी आदी कृषी विभागाशी निगडित असलेल्या योजनांचा आढावा घेतला.

शिंदे म्हणाले, की खरीप हंगामातील खते, बियाणांबाबत अलीकडच्या दोन-तीन वर्षांच्या काळात फार तक्रारी नाहीत. मात्र गतवर्षी बोंड अळीने मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत गावपातळीवर जाऊन माहिती द्या. बोंड अळीपासून निर्मूलनासाठीच्या उपाययोजनांबाबत व्यापक प्रसिद्धी व्हावी. बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे. त्यासाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली आहे. जमीन आरोग्य पत्रिकेनुसार कोणत्या भागातील जमीनीला कशाची गरज आहे, शेतकरी कोणते पीक घेत आहेत, कोणते घेतले पाहिजे याबाबत कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन करावे’’

 जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात गैरव्यवहार झाला आहे. कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी टक्केवारी घेतात. त्यामुळे कामात दर्जा राहात नाही अशा तक्रारी कृषी आढावा बैठकीमध्ये करण्यात आल्या. कामात गैरव्यवहार झाल्याचा दावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुरावे देऊ असा दावा केला. उपस्थित आमदारांनीही कृषी विभागाच्या कामाबाबत तक्रारी केल्या. ‘‘कोणत्या भागात, कोणत्या गावांत गैरव्यवहार झाला याची लेखी तक्रार पुराव्यासह करा, चौकशी करून कारवाई करतो, असे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली अथवा नैसर्गिक अापत्तीने मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या नावे सात बारा उतारा असणे बंधनकारक आहे. मात्र अनेक एकत्रित शेतकरी कुटुंबात प्रत्येकांच्या नावे जमीन नसते. त्यामुळे शेतकरी असूनही मदतीपासून वंचित रहावे लागते. मात्र सगळी माणसे शेती कसतात. त्यामुळे सातबारा उतारा संबंधिताच्या नावे नसला तरी कुटुंबातील शेती ग्राह्य धरावी आणि त्याबाबत सरकारपातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, सभापती रामदास भोर यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...