agriculture news in marathi, kharip planning, parbhani, maharashtra | Agrowon

परभणीत खरिपात सोयाबीन, मूग, तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 एप्रिल 2018
जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशीच्या क्षेत्रात यंदा घट होण्याची शक्यता आहे. गुलाबी बोंड अळीच्या योग्य व्यवस्थापनासाठी सुरवातीपासूनच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. कपाशीसाठी लेबल क्लेम नसलेल्या कीटकनाशकांची शिफारस करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
-बी. आर. शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी
परभणी  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये ५ लाख २१ हजार ८१० हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

 विविध पिकांच्या ९८ हजार ५० क्विंटल बियाणांची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे केली आहे. खरिपासाठी विविध ग्रेडच्या ८९,३६० टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयबीन, मूग, उडीद, तुरीच्या क्षेत्रात वाढ तर कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख २१ हजार ८१० हेक्टर आहे. गतवर्षी ५ लाख २१ हजार ७८२ हेक्टर वर पेरणी झाली होती. यंदा सर्वसाधारण क्षेत्राएवढीच पेरणी होईल असे गृहित धरण्यात आले आहे. गुलाबी बोंड अळीमुळे मोठे नुकसान झाल्याने यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात घट होईल तर सोयाबीन, मूग, उडिद, तूर, ज्वारी, बाजरी, मका, तीळ या पिकांखालील क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
 
गतवर्षीच्या खरीप हंगामात विविध पिकांच्या ४३ हजार २१ क्विंटल बियाणांची विक्री झाली होती. प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी यंदा महाबीजकडे २७ हजार ७७८ आणि खासगी कंपन्यांकडे ७० हजार २७२ अशी एकूण ९८ हजार ५० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
 
यामध्ये सोयाबीनचे ८६ हजार २५० कपाशीचे ४ हजार ८४, तुरीचे १८७५, मुगाचे १४२५, उडदाचे ४५६, मक्याचे २२५ क्विंटल बियाणांचा समावेश आहे. कपाशीचे प्रतिहेक्टर ५.५ पाकिट यानुसार यंदा प्रस्तावित १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी ९ लाख ७ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीनचे महाबीजकडे २३ हजार, राष्ट्रीय बीज निगम आणि कृषक भारतीकडे प्रत्येकी १००० अशी एकूण २५ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे.
 
खरीप हंगामासाठी विविध ग्रेडचा ८९३६० टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया ३३,४९०, डीएपी १५,०६०, पोटॅश ३६६०, एनपीके २९७५०, सिंगल सुपर फाॅस्फेट ७४०० टन या खतांचा समावेश आहे. गतवर्षीचा ३५ हजार टन खतसाठा शिल्लक आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.     

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...