यवतमाळमध्ये खरिपात तुरीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

खरीप पेरणी
खरीप पेरणी

यवतमाळ  : खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांची लगबग सुरू झालेली पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील यंदा नऊ लाख ११ हजार हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र या खरिपात कापसाच्या क्षेत्रात मोठी घट दाखविण्यात आलेली आहे, तर तूर पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाजही कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १३ लाख ५१ हजार ९६६ हेक्‍टर आहे. त्यातील नऊ लाख ६० हजार ५०० हेक्‍टर जमीन लागवड योग्य आहे. त्यामधील साधारणत: नऊ लाख हेक्‍टरवर दरवर्षी खरीप हंगामाची पेरणी केली जाते. यंदा ही मागील वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात फार बदल झालेला दिसत नाही. कृषी विभागाने नऊ लाख ११ हजार हेक्‍टरवर खरीप पेरणीचे नियोजन केलेले आहे.

मागील वर्षी कापसावर झालेला बोंड अळीचा प्रादुर्भाव व फवारणीमुळे झालेला शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू अशा अनेक बाबींमुळे यंदा कापसाचे लागवड क्षेत्र तब्बल ५० हजार हेक्‍टरने घटले आहे. कापसावर येणारी कीड -रोग व खर्च त्यातुलनेत मिळणारा हमीभाव यामुळे पेरणी क्षेत्रात बराच फरक पडेल, अशी शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कापूस जिल्ह्यातील प्रमुख व नगदी पीक असले, तरी सातत्याने आलेल्या संकटामुळे यंदा कपाशीच्या पेरणी क्षेत्रात ५० हजार हेक्‍टरने घट झालेली आहे. त्यातुलनेत तुरीच्या पेरणी क्षेत्रात ३५ हजार तर सोयाबीनच्या पेरणीक्षेत्रात १५ हजार हेक्‍टरने वाढ आहे.

खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन (आकडे हेक्‍टरमध्ये) ः कापूस ः ४,२७,१५०, सोयाबीन ः २,६९,१९८, तूर ः १, ५४, ५२०, ज्वारी ः २५,३४०, उडीद ः ९,१९८, मूग ः ९,३५४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com