agriculture news in marathi, kharip season farm working start, akola, maharashta | Agrowon

अकोल्यात पावसामुळे शेतीकामांनी घेतला वेग
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जून 2018

अकोला : या हंगामात पावसाने सुरुवात चांगली केली. जूनच्या सुरवातीपासून अाठवडाभरात जिल्हाभरात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे प्री माॅन्सून लागवड केलेली कपाशी उगवत अाहे. काही ठिकाणी हे पीक ताशी लागले अाहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचे अागमन हे चांगले संकेत मानले जात अाहेत.

अकोला : या हंगामात पावसाने सुरुवात चांगली केली. जूनच्या सुरवातीपासून अाठवडाभरात जिल्हाभरात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे प्री माॅन्सून लागवड केलेली कपाशी उगवत अाहे. काही ठिकाणी हे पीक ताशी लागले अाहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचे अागमन हे चांगले संकेत मानले जात अाहेत.

अकोला जिल्ह्यात या अाठवडाभरात सातही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. प्रामुख्याने अकोला, पातूर, बार्शिटाकळी या तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूरमध्येही पाऊस दाखल झाला. पावसाचे वेळेवर अागमन झाल्याने शेतीच्या मशागतीला वेग अाला अाहे. प्रत्येक शेतात काडीकचरा वेचणे, शेणखत टाकणे, नांगरटी, वखरणी अादी कामे होताना दिसतात. सिंचनाची सोय असलेल्या शेतांमध्ये कुठे कपाशी तर कुठे हळद लागवडीचे काम सुरू अाहे. हंगाम लक्षात घेता मशागती वेगाने होत अाहे.

या कामांसाठी मजुरांची मागणी वाढली. काडी कचरा वेचणी करणाऱ्यांना वेळेनुसार मजुरी द्यावी लागते अाहे. कमीत पाच तास काम केल्यास १०० रुपये द्यावे लागत अाहेत. सकाळी सहा वाजेपासून ११ वाजेपर्यंत काडीकचरा वेचणारे शेतांमध्ये काम करीत असतात. डिझेलचे दर वधारल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने होणारी वखरणी, नांगरणी प्रतिएकर १५० ते २०० रुपयांनी महाग झाली. बैलजोडीच्या साहाय्याने वखरणी केल्यास ५०० रुपये मजुरी अाहे. 

पावसाच्या अागमनामुळे बाजारपेठेत बियाणे, खतांच्या खरेदीसाठी थोडी गर्दी वाढली. अद्यापही अनेकांना पीककर्ज मिळाले नसल्याने गर्दी मात्र झाल्याचे दिसून येत नाही. अागामी अाठवड्यात बाजारातील गर्दी वाढून बियाणे, खतांच्या खरेदीची उलाढाल अधिक होईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे अाहे. एक ते सात जून दरम्यान अकोला जिल्ह्यातील पाऊस (मिमी) ः अकोला-३२.७१, बार्शिटाकळी - ३१.८५,अकोट -२८.५४, तेल्हारा -२७.०४, बाळापूर-३०.४५, पातूर -३५.५६, मूर्तिजापूर-३४.७०.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...