agriculture news in marathi, kharip season meeting, amaravati, maharashtra | Agrowon

विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत १ जूनला उच्चस्तरीय बैठक ः मंत्री प्रविण पोटे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 मे 2019

अमरावती : विमा कंपन्यांच्या हेकेखोरपणापुढे कृषी विभाग हतबल असल्याचे खरीप आढावा बैठकीतच लक्षात आलेल्या उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावण्याचे निर्देश दिले. शनिवारी (ता. १ जून) ही बैठक होणार आहे. 

अमरावती : विमा कंपन्यांच्या हेकेखोरपणापुढे कृषी विभाग हतबल असल्याचे खरीप आढावा बैठकीतच लक्षात आलेल्या उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावण्याचे निर्देश दिले. शनिवारी (ता. १ जून) ही बैठक होणार आहे. 

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य (कै.) गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून देण्यात येते. त्यासोबतच वातावरणातील बदलामुळे पीक उत्पादन घटल्यास भरपाई मिळवून देणारी पीकविमा योजनादेखील आहे. अपघात विम्याकरिता शासनाने कंपनीची नेमणूक केली. मात्र कंपनीचे धोरण अतिशय त्रासदायक असल्याचा मुद्दा आमदार बच्चू कडू, वीरेंद्र जगताप, अनिल बोंडे यांनी उपस्थित केला. २०१६ मध्ये ६१ पैकी केवळ ४१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. २०१७ मध्येदेखील तशीच स्थिती होती, असे आमदार बोंडे यांनी सांगितले.

यावर कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी कंपन्या आमचेही ऐकत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्‍त केली. प्रकरण दाखल करण्यास तीन महिन्यांपेक्षा अधिक उशीर झाला तर विमा कंपनी असा  प्रस्ताव स्वीकारत नाही. आमदार बच्चू कडू यांनी चांदूर बाजार तालुक्‍यातील ब्राह्मणवाडा थळी मंडळात विमा कंपनी, कृषी विभागाच्या पाहणीत आलेल्या तफावतीचा मुद्दा मांडला. कृषी विभाग या भागातील शेतकरी विमा परतावा मिळण्यास पात्र असल्याचे सांगतो तर कंपनी ते नाकारते. हा घोळ पुढे येताच सर्वच आमदार अवाक झाले. त्यावर कृषी आयुक्‍त, कृषी सचिवांना या संदर्भातील अहवाल पाठविण्याची सूचना विभागीय कृषी सहसंचालकांना या वेळी करण्यात आली.   

पालकमंत्री घेणार बैठक
पीकविमा कंपन्यांच्या मुजोरीचे अनेक किस्से समोर आले. त्याची दखल घेत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी १ जूनला विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...