agriculture news in marathi, kharip season planning, nanded, maharashtra | Agrowon

नांदेड जिल्ह्याला एक लाख क्विंटल बियाण्यांची गरज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप हंगामामध्ये ८ लाख २ हजार ९०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. नियोजित क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीसाठी १ लाख ९ हजार ४४० क्विंटल बियाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. येत्या खरीप हंगामासाठी २ लाख २६ हजार ६६३ टन रासायनिक खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षीचा ५० हजार ५२७ टन खतसाठा शिल्लक आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी माहिती दिली.

नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप हंगामामध्ये ८ लाख २ हजार ९०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. नियोजित क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीसाठी १ लाख ९ हजार ४४० क्विंटल बियाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. येत्या खरीप हंगामासाठी २ लाख २६ हजार ६६३ टन रासायनिक खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षीचा ५० हजार ५२७ टन खतसाठा शिल्लक आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी माहिती दिली.

असे असेल पेरणी क्षेत्र
नांदेड जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात ८ लाख २ हजार ९०० हेक्टरवर पेरणी होईल असे गृहित धरण्यात आले आहे. प्रस्तावित पेरणी क्षेत्रामध्ये ज्वारी ७५ हजार १००, बाजरी ५०, मका १ हजार, भात १ हजार १००, तूर ६५ हजार ८०, मूग २८ हजार, उडीद ३६ हजार, भुईमूग ५०, सूर्यफूल ५००, तीळ ७००, सोयाबीन ३ लाख ४८ हजार, कापूस २ लाख ४० हजार अन्य पिके ६ हजार ६०० हेक्टरचा समावेश आहे.

प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार बियाणे बदलातील दरानुसार यंदा एकूण १ लाख ९ हजार ४४० क्विंटल बियाण्याची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक बियाणे उत्पादक कंपन्याकडे (महाबीज) ६७ हजार १२० आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे ४० हजार ५९० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. मागणी करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये ज्वारी ५ हजार ५१५, बाजरी १ क्विंटल २५ किलो, भात १८८, तूर ३ हजार ६५१, मूग १ हजार ५५४, उडीद १ हजार ९९८, मका ५२२, भुईमूग १९ क्विंटल ५० किलो, सूर्यफूल ५० किलो, तीळ १० क्विंटल ५ किलो, सोयाबीन ८५ हजार २६० अन्य पिके १ हाजर ९८० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

दोन लाख ७७ हजार टन खते होतील उपलब्ध
येत्या खरीप हंगामासाठी २ लाख ५४ हजार ६०० टन खतांची मागणी करण्यात आली होती. परंतु २ लाख २६ हजार ६६३ टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया ७६ हजार ३९१ टन, डिएपी ३५ हजार ९३१ टन, पोटॅश १९ हजार ८३१ टन, सुपर फाॅस्फेट ३६ हजार ७५९ टन, संयुक्त खते (एनपीके) ५७ हजार ७५१ टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षीचा ५० हजार ५९७ टन खतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे खरिपामध्ये एकूण २ लाख ७७ हजार ६६० टन खतसाठा उपलब्ध रहील, असे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...