agriculture news in marathi, `kharip`s sowing danger in Trimbakeshwar | Agrowon

त्र्यंबकेश्वरमधील खरिपाच्या पेरण्या धोक्‍यात
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्‍यास मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या खरिपाच्या पेरण्या धोक्‍यात आल्या आहेत. मागील आठवड्यात केवळ त्र्यंबकेश्वर शहरात बऱ्यापैकी पाऊस बरसला. त्या व्यतिरिक्त तालुक्‍यात तुरळक वगळता दमदार पाऊस झालेला नाही. तालुक्‍यातील धरणांतील जलसाठा आता तळाला गेला आहे.

तालुक्‍यात धरणांची संख्या लक्षणीय आहे. गौतमी बेझे, अंबोली, कोणे, वाघेरे, अंजनेरी आदी धरणांतील जलसाठा आता तळाला गेला आहे. मॉन्सून तोंडावर आल्याचे दिसत असताना अचानक घुमजाव झाले आहे.

त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्‍यास मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या खरिपाच्या पेरण्या धोक्‍यात आल्या आहेत. मागील आठवड्यात केवळ त्र्यंबकेश्वर शहरात बऱ्यापैकी पाऊस बरसला. त्या व्यतिरिक्त तालुक्‍यात तुरळक वगळता दमदार पाऊस झालेला नाही. तालुक्‍यातील धरणांतील जलसाठा आता तळाला गेला आहे.

तालुक्‍यात धरणांची संख्या लक्षणीय आहे. गौतमी बेझे, अंबोली, कोणे, वाघेरे, अंजनेरी आदी धरणांतील जलसाठा आता तळाला गेला आहे. मॉन्सून तोंडावर आल्याचे दिसत असताना अचानक घुमजाव झाले आहे.

उसनवारीद्वारे शेतकऱ्यांची बियाणे खरेदी
बाजारात बियाणे घेण्यासाठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत हंगाम साधण्यासाठी उधार उसनवारी करून शेतकरी बियाणे खरेदी करीत आहेत.
या वर्षी बियाण्यांच्या किमती वाढलेल्या असून, त्यात जीएसटीची भर पडलेली
आहे.

कृषी खात्याकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
खरीप हंगाम साधण्यासाठी बळिराजा सरसावला आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा त्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. तालुका कृषी खाते सोशल मीडियातून माहिती टाकत असून, प्रत्यक्ष मार्गदर्शनाबाबत हात झटकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणे कठीण झाले आहे. सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचत नाहीत. कृषी खाते असून नसल्यासारखे झाले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी प्रचंड संतापले आहेत. पंचायत समिती, कृषी विभाग बंद करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तालुक्‍यात असलेल्या बी-बियाणे औषधे आदी विक्रीवर या विभागाचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...