agriculture news in marathi, Khattar announces to establish Kisan Kalyan Pradhikaran to provide relief to farm household | Agrowon

शेतकऱ्यांच्या विकासासाठी हरियानात स्वतंत्र प्राधिकरण
वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

चंदीगड, हरियाना  : राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मनोहरलाल खट्टर सरकारने स्वतंत्र ‘हरियाना शेतकरी कल्याण प्राधिकरणा’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, की शेतीला किफायतशीर करणे, कृषी उत्पादकता आणि शेतकरी उत्पन्न वाढविणे या मुख्य उद्देशांसह शेतकरी कुटुंब आणि भूमिहीन मजुरांच्या शारीरिक, आर्थिक आणि तणावतणाव व्यवस्थापनाचे कार्यही हे प्राधिकरण करणार आहे. 

चंदीगड, हरियाना  : राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मनोहरलाल खट्टर सरकारने स्वतंत्र ‘हरियाना शेतकरी कल्याण प्राधिकरणा’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, की शेतीला किफायतशीर करणे, कृषी उत्पादकता आणि शेतकरी उत्पन्न वाढविणे या मुख्य उद्देशांसह शेतकरी कुटुंब आणि भूमिहीन मजुरांच्या शारीरिक, आर्थिक आणि तणावतणाव व्यवस्थापनाचे कार्यही हे प्राधिकरण करणार आहे. 

‘आणखी एक सुधारणा’ या मुख्यमंत्री खट्टर यांच्या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आयोजित प्रगतशील शेतकरी संवाद उपक्रमात त्यांनी ही घोषणा केली. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री ओ. पी. धानकर अाणि अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री करण देव कम्बोज या वेळी उपस्थित होते.  

मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे. याकरिता स्थापन करण्यात येणारे प्राधिकरण राज्यातील शेतकरी कुटुंबांसमोरील आव्हानांची सोडवणूक करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. मुख्यमंत्री खट्टर यांनी राज्यात प्रत्येक महिन्यात एक सुधारणा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 

मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, की कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ११०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देशभरात ४२ फूड पार्क उभारली जाणार आहे. हरियाणातील प्रगतशील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवा. लवकरच राज्य सरकार ‘आणखी एक सुधारणा’ उपक्रमातून ‘शेतकरी कल्याण कार्य्रकमा’चे आयोजन करणार आहे. या अंतर्गत प्रगतशील शेतकऱ्यांना सन्मान केला जाईल.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...