agriculture news in marathi, Khojewadi Starts first Animal camp in state for drought affected area | Agrowon

खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणी
सूर्यकांत नेटके
रविवार, 16 डिसेंबर 2018

नगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने दुष्काळ जाहीर करूनही केला खरा, पण अजून कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आता शेतकरी आपल्या परिने मार्ग काढू लागले आहेत. सर्वाधिक झळा बसल्‍या असलेल्या पाथर्डी (जि. नगर) तालुक्‍यातील खोजेवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून जनावरांची छावणी सुरू केली आहे. सध्या येथे ८० जनावरे आहेत. अजूनही जनावरे येत आहेत. यंदा सुरू झालेली ही राज्यातील पहिली छावणी आहे. 

नगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने दुष्काळ जाहीर करूनही केला खरा, पण अजून कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आता शेतकरी आपल्या परिने मार्ग काढू लागले आहेत. सर्वाधिक झळा बसल्‍या असलेल्या पाथर्डी (जि. नगर) तालुक्‍यातील खोजेवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून जनावरांची छावणी सुरू केली आहे. सध्या येथे ८० जनावरे आहेत. अजूनही जनावरे येत आहेत. यंदा सुरू झालेली ही राज्यातील पहिली छावणी आहे. 

नगरसह राज्याच्या अनेक भागांत पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही, त्यामुळे खरिपात नुकसान झाले. परतीचा पाऊसही आला नाही म्हणून रब्बीची पेरणीच झाली नाही. नदी, नाले, तलाव, कोरडे असून पाणी पातळी वाढीला यंदा अजिबात मदत झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून एप्रिल-मे मध्ये कोरडे पडणारे जलस्राेत आक्‍टोबर, नोव्हेंबरमध्येच कोरडे पडले. पाणी नसल्याने शेतीचा प्रश्‍न जटील बनला. जनावरांना चारा, पाणी मिळेनासे झाले. अजून सात महिने कसे काढणार याची चिंता आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दुष्काळाची तीव्रता पाथर्डी तालुक्‍यात आहे. सध्या फक्त पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. एकट्या तालुक्‍यात तब्बल सव्वासे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला, परंतु अजून कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. जनावरांच्या छावण्या सुरू करणार की दावणीला चारा देणार हे अजून स्पष्ट नाही. शेतकरी मात्र जनावरे जगवताना त्रस्त आहे.

पाथर्डी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आता आपल्या परीने पर्याय शोधायला सुरवात केली आहे. येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद मरकड यांच्या संकल्पनेतून खोजेवाडी येथे लोकसहभागातून पाच दिवसांपासून जनावरांची छावणी सुरू केली आहे. त्यासाठी काही शेतकऱ्यांनीही मदत करण्यासाठी हात पुढे केले आहे. सध्या येथे ८० जनावरे दाखल आहे. एका शेतकऱ्याने साधारण दोन जनावरे आणावीत असे अवाहन केले आहे. लोकसहभागातून सुरू झालेली ही राज्यातील पहिली छावणी आहे. ही छावणी लोकांच्या मदतीवर आहे. जो पर्यंत मदत येत राहील, तेवढ्या दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकार फक्त घोषणा करतेय, उपाययोजना कधी करणार. सरकारी उपाययोजना सुरू होईपर्यंत मोठे नुकसान झालेले असेल. त्यामुळे आम्ही लोकसहभागातून चारा छावणी सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- शरद मरकड, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पाथर्डी

‘‘आमच्या भागात तीव्र दुष्काळ आहे. मात्र अजून कसल्याही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही लोकसहभागातून छावणी सुरू केली आहे. दुष्काळात एकमेकांना आधार देऊन मात करावी लागणार आहे.’’
- सत्यवान बर्डे, शेतकरी, निंवडूगे, ता. पाथर्डी 

इतर अॅग्रो विशेष
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...