agriculture news in marathi, kidneystone in livestock | Agrowon

शस्त्रक्रियेने बरा होतो जनावरांतील मूतखडा
डॉ. गिरीश यादव, डॉ. दिनेश लोखंडे
शुक्रवार, 4 मे 2018

मूतखडा हा रोग प्रमुख्याने खच्चीकरण केलेला बैल, कुत्रे, बकरे व उंटामध्ये आढळतो. जनावरात मूतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा होतो, हे अनेक पशुपालकांना माहीत नसते. त्यामुळे या रोगाची लक्षणे दिसताच पशुवैद्यकाकडून त्वरित उपचार व शस्त्रक्रिया करावी व होणारे नुकसान टाळावे.

साधारणतः उन्हाळात मूतखड्याचे प्रमाण जास्त आढळते. अापल्या जनावरांना हा रोग होऊ नये म्हणून रोगाची कारणे, लक्षणे अाणि उपचार जाणून घेणे अावश्‍यक अाहे.

रोगाची कारणे

मूतखडा हा रोग प्रमुख्याने खच्चीकरण केलेला बैल, कुत्रे, बकरे व उंटामध्ये आढळतो. जनावरात मूतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा होतो, हे अनेक पशुपालकांना माहीत नसते. त्यामुळे या रोगाची लक्षणे दिसताच पशुवैद्यकाकडून त्वरित उपचार व शस्त्रक्रिया करावी व होणारे नुकसान टाळावे.

साधारणतः उन्हाळात मूतखड्याचे प्रमाण जास्त आढळते. अापल्या जनावरांना हा रोग होऊ नये म्हणून रोगाची कारणे, लक्षणे अाणि उपचार जाणून घेणे अावश्‍यक अाहे.

रोगाची कारणे

 • खच्चीकरण केलेल्या बैलाच्या मूत्रमार्गाची रुंदी खच्चीकरण केल्यानंतर कमी होते व हा रोग होतो.
 • बैलाचा मूत्रमार्ग हा इंग्रजी ‘एस’ आकाराचा असतो. हे मूतखडे ‘एस’ मार्गाच्या दोन वळणापैकी एका वळणावर प्रमुख्याने आढळतात.
 • जनावरांना उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात योग्य प्रमाणात पिण्यासाठी पाणी मिळत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तातील क्षार वाढतात व ते लघवीच्या स्वरूपात उत्सर्जित होतात व हे क्षार मूत्रमार्गात येऊन साचतात त्यामुळे मूतखडा होतो.
 • जनावरांना क्षारयुक्त, खारे व जड पाणी दिल्यामुळेसुद्धा मूतखडा होतो.
 • अन्नातून खनिजाचा पुरवठा जास्त प्रमाणात झाल्यास गारगोटी किंवा एस्ट्रोजनयुक्त वनस्पतीची वैरण जास्त दिल्यास.
 • ओक्सलेट किंवा फाॅस्फेटयुक्त अन्न दिल्यास.
 • मूत्रपिंडाचा विकार किंवा मूत्रपिंडापासून मूत्रनलिकेपर्यंत कोठेही जखम झाल्यास.
 • ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता, कॅल्शियम व फाॅस्फरसचे शरीरातील संतुलन बिघडल्यामुळे.
 • मूत्रनिलाकेत जखम असल्यास.

लक्षणे

 • मूतखडा हा मूत्रमार्गात इजा झाल्यास किंवा ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कामतरतेमुळे मूत्रमार्गातील तांबूस पेशी मूत्रमार्गात (विशेषतः ‘एस’ मार्गाच्या शिश्नाच्या वळणात) येऊन चिकटतात. या पेशीवर लघवीतून उत्सर्जित होणाऱ्या क्षाराचे थर साचतात व त्याचा आकार हळूहळू वाढतो म्हणूनच प्रथम मूतखड्याचा आकार लहान असल्यामुळे मूत्रवाहिनी अंशतः बंद होते व नंतर मूत्रवाहिनीत खड्याचा आकार वाढल्यामुळे ती पूर्णपणे बंद होते.
 • गायीमध्ये मूत्रवाहिनीची लांबी कमी व रुंदी जास्त असते, त्यामुळे हा रोग गायींमध्ये आढळत नाही.
 • कुत्र्यांमध्ये मूतखडे मूत्रपिंड व मूत्राशयात सापडतात.
 • मूतखडा झालेले जनावर थेंब थेंब लघवी करते किंवा लघवी पूर्णपणे बंद होते.
 • लघवी बंद झाल्यामुळे मूत्राशयातील लघवीचे प्रमाण वाढते व मूत्राशायावर ताण येतो त्यामुळे जनावरे कळ देतात व वेदना झाल्यामुळे जनावर उठबस करते, पाठ ताणते व पोटावर पायाने लाथा मारते.
 • जनावर खातपीत नाही, लेंड्यायुक्त शेण टाकते, डोळे खोल जातात. जनावराची कातडी खडबडीत होते.

उपचार

 • वरील लक्षणे दिसताच उपचार करावा नाहीतर मूत्राशयाच्या पिशवीवर जास्त लाघवी साठून ताण वाढतो व मूत्राशयाची पिशवी फुटते. मूतखडे जर तीक्ष्ण स्वरूपाचे असतील, तर मूत्रमार्ग फाटून लघवी कातडीखाली जमा होते व तेथे सूज येते.
 • लघवीमुळे बऱ्याच वेळेस शिस्न सुजते व निकामी होते. साधारणतः ही सूज शिस्नाच्या मागील बाजूस असते.
 • मूखड्यावर जर सुरवातीस उपचार केला तर मूत्राशयाची पिशवी फाटणे टाळता येते. जर ही पिशवी फाटली तर लघवी पोटात साठून राहते व रक्तात शोषली जाते. त्यामुळे लघवीतील नत्र रक्तात मिसळले जातात व जनावरांना ‘मूत्रज्वर’ होतो. अशा प्रकारचे मूत्रज्वर झालेले जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते.
 • मूत्राशयाची पिशवी फुटल्यानंतर दोन ऑपरेशन करावे लागतात. प्रथमतः मूत्र मार्गातील मूतखडा काढणे व नंतर फाटलेले मूत्राशय शिवण्याचे. त्यासाठी वेळीच लक्ष दिले व उपाय केला तर दुसरे ऑपरेशन टळू शकते व जनावर निश्चितपणे वाचते.

मूतखडा रोग टाळण्याठी...

 • जनावरांना सकस व संतुलित आहारासोबत शुद्ध, गोड अाणि भरपूर प्रमाणात पाणी द्यावे.
 • ‘अ’ जीवनसत्त्वाचा जनावरांना खाद्द्यातून पुरवठा व्हावा व जनावरांना पावसाळ्यात व हिवाळ्यात दोन वेळेस व उन्हाळ्यात तीन वेळेस पिण्यासही भरपूर पाणी दिले तर मूतखडा होण्यास निश्चितच प्रतिबंध होईल.
 • घरगुती जुजबी उपचार न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच उपचार करावेत.

संपर्क ः डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६
(मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय परळ, मुंबई)  

इतर कृषिपूरक
योग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा...दुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन...
दुधातील घटकांवर परिणाम करणारे घटक दुधातील स्निग्ध पदार्थ व एसएनएफ यांच्या...
दुग्धोत्पादन, प्रजननासाठी खनिज मिश्रणेजनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात...
टंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्...भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध...
योग्य उपचाराने दूर करा मायांग बाहेर...दुधाळ जनावरांतील गायी व म्हशींमध्ये विण्यापूर्वी...
पोळ्याला घ्या बैलांची काळजीबैलपोळ्यादिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना...
शेळ्यांच्या अाहारातील झाडपाल्याचे...शेळ्या झाडपाला खूप आवडीनं खातात. त्यामुळे शेतातील...
कुक्कुटपालन सल्ला कोंबड्यांना पावसाळ्यातील वातावरणामुळे विविध...
बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी गोठ्यात...जनावरांच्या शरीरावर, केसांमध्ये अाढळणाऱ्या बाह्य...
योग्य व्यवस्थापनातून कमी होते मिथेन...जनावरे खाल्लेला चारा रवंथ करतात. खाद्य खाताना...
गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाची सूत्रेजास्त दूध व फॅट मिळवण्यासाठी तसेच त्यापासून विविध...
खाद्य व्यवस्थापनात साधली प्रति किलो १८...निरा (जि. पुणे) येथील पंडित चव्हाण यांच्याकडे...
शेततळ्यातील मत्स्यपालन यशस्वी करण्याची...अगदी जिरायती क्षेत्रातही २ ते १० गुंठ्यांपर्यंत...
शेळ्यांना आहे वर्षभर मार्केटसांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर, सांगली)...
रेशीम उद्योगाने आणली कौटुंबिक स्थिरता पूर्वी पूरक म्हणून सुरू केलेला रेशीम उद्योग आता...
वेळीच करा जनावरांमधील आंत्र परोपजीवींचे...आंत्रपरोपजीवीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची भूक...
योग्य प्रजनन व्यवस्थापनातून वंधत्व...जनावरातील वंधत्वामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन...
स्वच्छता, लसीकरणातून कमी करा शेळ्यांतील...शेळ्यांची सर्वात जास्त काळजी पावसाळ्यामध्ये...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
जनावरांना खुराकासोबत द्या बायपास फॅट,...संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ,...