agriculture news in marathi, Kisan manch announces agitation from 7 dec, Aurangabad, Mahararashtra | Agrowon

किसान मंचाचा आंदोलनाचा शंखनाद
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसह इतर मागण्यांवर ७ डिसेंबरपासून राज्यभरात जेल भरो आंदोलन छेडले जाणार आहे. त्यासाठी ७ नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत राज्यभरातून जवळपास दहा लाख शेतकरी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध सविनय कायदेभंगाच्या सनदशीर व शांततेच्या मार्गाने प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांना तुरुंगात जाण्याचे इच्छापत्र सादर करतील, असा निर्णय किसान मंचाच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. 

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसह इतर मागण्यांवर ७ डिसेंबरपासून राज्यभरात जेल भरो आंदोलन छेडले जाणार आहे. त्यासाठी ७ नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत राज्यभरातून जवळपास दहा लाख शेतकरी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध सविनय कायदेभंगाच्या सनदशीर व शांततेच्या मार्गाने प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांना तुरुंगात जाण्याचे इच्छापत्र सादर करतील, असा निर्णय किसान मंचाच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. 

शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय्य हक्‍कांसाठी लढा देण्याकरिता स्थापन किसान मंचाच्या राज्यस्तरीय कार्यसमितीची बैठक रविवारी (ता.५) औरंगाबादेत पार पडली. अध्यक्ष मंचचे निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे होते. त्यांनी आंदोलनाचा निर्णय स्पष्ट केला. बैठकीला शेतमजूर प्रतिनिधी आमदार जयदेव गायकवाड, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्डे, किसान मंच कार्यकारी सदस्यप्रमुख किशोर माथनकर, शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शंकर गोडसे, मानवेंद्र काचोळे, शेतकरी जागर मंच प्रमुख प्रशांत गावंडे, भारत कृषक समाजाचे अविनाश आदिक, स्वाभिमानी संघटनेचे गजानन अमदाबादकर, माजी आमदार वसंत बोंडे, खेमराज कौर, दत्ता पवार, शिवाजी बनकर, प्रा. मारोती जाधव आदीं उपस्थित होते.

किसान मंचच्या माध्यमातून ९ ऑगस्ट ते २ ऑक्‍टोबरदरम्यान सेवाग्राम ते नाशिकदरम्यान शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान काढण्यात आले होते. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाचे हमीभाव, वीजपुरवठा व पीकविम्याबाबत सरकारकडून चालविलेला पोरखेळ थांबविण्यासाठी सरकारला ५ नोव्हेंबरपर्यंतची वेळ देण्याचा ठराव शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाच्या नाशिक येथील समारोपीय कार्यक्रमात करण्यात आला होता. दिलेल्या वेळेत सरकारकडून निर्णय न झाल्यामुळे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी किसान मंचच्या राज्यभरातील २५० तालुक्‍यांतील प्रमुख कार्यसमिती सदस्यांची बैठक रविवारी औरंगाबाद येथील कै. भानुदास चव्हाण सभागृहात घेण्यात आली. 

बैठकीतील ठरावांची माहिती देताना श्री. धोंडगे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसह इतर जिव्हाळ्याच्या विविध मागण्यांवर विविध संघटनांची आंदोलने केली. विरोधी पक्षांकडूनही विधिमंडळात आवाज उठविला गेला. न्यायालयीन लढा अशा वेगवेगळ्या स्तरांवरून प्रयत्न होउनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली.  त्यामुळे शासनाच्या धोरणाविरुद्ध सविनय कायदेभंगाच्या सनदशीर मार्गाने माझी तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचे इच्छापत्र राज्यभरातील जवळपास दहा लाख शेतकरी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देतील, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपस्थित झालेल्या किसान मंचमधील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ निर्णायक लढा उभारण्याची इच्छा व्यक्‍त केली. 

प्रास्ताविक दत्ता पवार यांनी केल. जळगावचे सोपानराव पाटील, गोंदियाचे मनोहर चंद्रीकापुरे, परभणीचे सुरेंद्र रोडगे, यवतमाळचे अशोकराव धारपळकर, मानवेंद्र काचोळे, शिवाजीराव बनकर, किशोर माथनकर आदी उपस्थित होते. अकोल्याचे प्रशांत गावंडे यांनी सूत्रसंचालन केले. 

शेतकऱ्यांचा जात-धर्म दाखविण्याची वेळ आली आहे. सरकारने हे वेळीच ध्यानी घ्यावे, चर्चा नको निर्णय हवा. सात डिसेंबरपासून केले जाणारे जेल भरो आंदोलन राजकारणविरहित सनदशीर व शांततेच्या मार्गाने केले जाईल.
- माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, निमंत्रक किसान मंच

इतर बातम्या
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे...पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’...
शेतकऱ्यांसाठी हमीभाव दिवास्वप्नचमुंबई : सध्या शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावरून...
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढकोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा...
संयुक्त खतांच्या किमती वाढल्यानागपूर ः वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील...
हेक्टरी २९१ किलोच तुरीची खरेदीसांगली : वेळ सकाळी दहाची...जत तालुक्‍यातील शेतकरी...
सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यतानवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची...पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा...
‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला...नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील...
माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडेरावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवरपुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’ खर्च करणार ‘केम...अकोला  ः कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास...
खतांवरील अनुदानाबरोबरच किमतीही हव्यात...खत उद्योगाच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकार व राज्य...
आता आरोग्यासाठी ‘न्यूट्रासिटिकल्स’औषधनिर्माणशास्त्र आणि अन्ननिर्मितीशास्त्र...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर...पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...