agriculture news in marathi, kisan Putra Andolan, Amar Habib | Agrowon

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी न्यायालयात दाखल करणार याचिका
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

अंबाजोगाई, जि. बीड : शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका किसानपुत्र दाखल करणार असल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली.

अंबाजोगाई, जि. बीड : शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका किसानपुत्र दाखल करणार असल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली.

श्री. हबीब म्हणाले, की नागपूर येथे ६ व ७ जानेवारी १८ रोजी झालेल्या शिबिरात याविषयी सखोल चर्चा झाली. चर्चेनंतर शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनमंच या व्यासपीठाने हे शिबिर आयोजित केले होते. ॲड. सुभाष खंडागळे, मकरंद डोईजड, प्रमोद चुंचुवार यांनी याविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुरडे व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अनिल किलोर यांनी याबाबत पाठिंबा दर्शविला.

मकरंद डोईजड व अनंत देशपांडे वेगवेगळ्या दोन याचिका दाखल करणार आहेत. शिवाय लोकसभा व विधानसभेत कायद्याच्या पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी अमर हबीब व प्रमोद चुंचुवार प्रयत्न करणार आहेत. याचिकांसाठी होणाऱ्या खर्चाचा काही भार महाराष्ट्रातील किसानपुत्रांनी उचलावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

''शेतकरीविरोधी कायदे का रद्द करावेत?'' या आपण लिहिलेल्या मराठी पुस्तिकेचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर केलेल्या आवृत्तीचे येत्या फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे प्रकाशन करण्यात येईल. येत्या ३ व ४ मार्च रोजी आंबेठाण (पुणे) येथे किसानपुत्रचे तिसरे राज्यस्तरीय शिबिर होणार असून, प्रदीप गुट्टे व असलम त्याच्या तयारीला लागले आहेत.

१८ जून १९५१ रोजी भारताच्या मूळ घटनेत पहिली घटनादुरुस्ती करून तत्कालीन हंगामी सरकारने शेतकऱ्यांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले. त्याचा निषेध करण्यासाठी व डॉ. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या मूळ घटनेची पुनर्स्थापना करावी यासाठी मुंबई येथे ''मूळ घटना पुनर्स्थापना मागणी दिन'' साजरा केला जाईल. त्यासाठी मुंबई येथे विशेष कार्यक्रम केला जाईल. प्रमोद चुंचुवार, डॉ. आशिष लोहे व मकरंद जहागीरदार हे किसानपुत्र या कार्यक्रमात सहभागी होतील, असेही श्री. हबीब यांनी स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्रातील किसानपुत्रांनी याचिकाकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्‍यक आहे. दिल्लीत जाऊन याचिका दाखल करणे व त्याचा पाठपुरावा करणे कोण्या एका व्यक्तीच्या आवाक्‍यातले नाही. हे ऐतिहासिक काम करण्यासाठी जी आर्थिक मदत लागेल ती आपण सर्व मिळून उभी करू.
- अमर हबीब, किसानपुत्र आंदोलन.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...