Agriculture News in Marathi, kisan sabha president shankar dhondge threaten to launch agitattion, maharashtra | Agrowon

सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 डिसेंबर 2017

औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक व्यावसायिकांना विनाअट सरसकट कर्जमुक्‍तीच्या मागणीसह विविध दहा मागण्यांसंदर्भात किसान मंचच्या माध्यमातून जेल भरो आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती किसान मंचचे निमंत्रक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली.

औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक व्यावसायिकांना विनाअट सरसकट कर्जमुक्‍तीच्या मागणीसह विविध दहा मागण्यांसंदर्भात किसान मंचच्या माध्यमातून जेल भरो आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती किसान मंचचे निमंत्रक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली.

औरंगाबादेत किसान मंचच्या झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली होती. त्याचवेळी न्याय्य मागण्यांसंदर्भात शासनाने न्यायोचित भूमिका न घेतल्यास दहा लाख शेतकरी, शेतमजूर स्वेच्छेने तुरुंगात जाणार असल्याचे इच्छापत्र प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेला प्रतिसाद मिळत असून पहिल्या टप्प्यात सातारा, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, वाशीम आदी जिल्ह्यांतून जवळपास 30 ते 35 हजार शेतकऱ्यांनी तुरुंगात जाण्याचे इच्छापत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे श्री. धोंडगे म्हणाले.

येत्या 15 डिसेंबरनंतर इच्छापत्र भरून देण्याच्या मोहिमेची गती तीव्र करण्यात येणार आहे. जेव्हा दहा लाख शेतकऱ्यांची इच्छापत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जातील, तेव्हा जेल भरोसंदर्भातील घोषणा केली जाणार आहे, असे श्री. धोंडगे यांनी सांगितले.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या, यासह अन्य मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना नुकतेच देण्यात आले. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर जेल भरो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. जालन्याचे किसान मंचचे जिल्हा निमंत्रक संजय सोळंके, जिल्हाध्यक्ष बळवंत देशमुख, सुरेश खांडेभराड, कैलास जिगे, रामदास रोडे, विष्णुपंत गिराम आदींची या वेळी उपस्थिती होती.

अशा आहेत मागण्या

  • शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक व्यावसायिकांना
  • सरसकट विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या.
  •  शेतीमालाला उत्पादन खर्चानुसार कायदेशीर हमीभाव द्या.
  • शेतकरी, शेतमजुरांना कायद्याने आर्थिक व सामाजिक संरक्षण द्यावे.
  • पेरणी ते काढणीपर्यंतची सर्व कामे मनरेगाअंतर्गत करावीत.
  • तरुणांना काम नाही, त्यामुळे त्यांना उपजीविकेसाठी मानधन द्यावे.
  • शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत.
  •  पिकांचे अनुदान, दुष्काळी मदत व हमी किमतीतील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी.
  • शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करू नये, तसेच संपूर्ण वीजबिल माफ करावे.

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...