agriculture news in marathi, kishor tiwari demands to relax code of conduct, mumbai, maharashtra | Agrowon

'मतदान झालेल्या दुष्काळी भागात आचारसंहिता शिथिल करा'
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. राज्यात दुष्काळग्रस्त असलेल्या विदर्भातील सर्व, तर मराठवाड्यातील बहुतांश मतदारसंघांतील निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील आदर्श आचारसंहिता तत्काळ शिथिल करावी, अशी मागणी कै. वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.

मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. राज्यात दुष्काळग्रस्त असलेल्या विदर्भातील सर्व, तर मराठवाड्यातील बहुतांश मतदारसंघांतील निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील आदर्श आचारसंहिता तत्काळ शिथिल करावी, अशी मागणी कै. वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.

यासंदर्भात श्री. तिवारी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा देखील केली आहे. दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यात १० मार्चपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी केल्यापासून दररोज ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या काळात हा आकडा २९२ वर गेला आहे, असा दावा तिवारी यांनी केला आहे. अन्नसुरक्षा, आरोग्य सुरक्षा, रोजगार, पाणी, चारा आणि नवीन पीककर्ज याबाबतचे प्रश्न निवडणुकीचे काम समोर करून सनदी अधिकारी, कर्मचारी टाळत आहेत. त्यामुळे धोरणात्मक निर्णय वगळता मदत पुनर्वसनाच्या कामांना गती देण्याकरता लोकसभेच्या मतदानाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यात निवडणूक झालेल्या भागात आदर्श आचारसंहितेला शिथिल करण्याची गरज आहे, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

१० मार्चपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाल्यांनतर विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांचे पाणी, चारा तसेच मजुरीसाठी हाल होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा तक्रारी आल्यानंतर मदत पुनर्वसनच्या कामांना आदर्श आचारसंहितेचा नावावर का रोखत आहात, अशी विचारणा केल्यावर अधिकारी निवडणूक आयोग आणि आचारसंहितेचे कारण समोर करत आहेत. यामुळे  तिवारी यांनी हा वाद निवडणूक आयोगसमोर आणला. चारा आणि पाणी नसल्यामुळे विदर्भ तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना जनावरे मातीमोल किमतीत विकावी लागत आहेत. त्यातच रोजगार हमी योजनेची कामेच उपलब्ध नसल्यामुळे उपासमार होत असल्याची खंत श्री. तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...