agriculture news in marathi, Kokan kapila cow registered at national level, Maharashtra | Agrowon

राष्ट्रीय पातळीवर झाली ‘कोकण कपिला’ची नोंदणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

पुणे ः कोकणातील उष्ण, दमट हवामान आणि अति पावसात तग धरणारी आणि डोंगराळ भागात चराईवर पोषण आणि दूध उत्पादन देणाऱ्या काटक अशा ‘कोकण कपिला’ या गोवंशाची नोंदणी राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.

पुणे ः कोकणातील उष्ण, दमट हवामान आणि अति पावसात तग धरणारी आणि डोंगराळ भागात चराईवर पोषण आणि दूध उत्पादन देणाऱ्या काटक अशा ‘कोकण कपिला’ या गोवंशाची नोंदणी राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय पशू अानुवंशिक संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेली काही वर्षे कोकणातील स्थानिक गाईंचे सर्वेक्षण करून संशोधन करण्यात आले. या संशोधनातून स्थानिक गाईंमध्ये भारतातील इतर गोवंशापेक्षा वेगळपण दिसून आले. या गाईमधील जनुके राज्यातील इतर गाईंपेक्षा वेगळी आहे. अधिक संशोधानंतर राष्ट्रीय पशू अानुवंशिक संशोधन संस्थेने कोकणातील या वैशिष्ट्यपूर्ण गोवंशाची ‘कोकण कपिला’ या नावाने नुकतीच नोंदणी केली. 

पशुपालकांच्या बरोबरीने गोवंश संशोधन आणि संवर्धन 
पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख  डॉ. बी. जी. देसाई म्हणाले, की कोकण कपिला हा गोवंश ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये दिसून आला आहे. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही जातिवंत गाय, बैल संशोधनासाठी निवडलेले आहेत. निळेली (जि. सिंधुदुर्ग) आणि वाकवली (जि. रत्नागिरी) येथील प्रक्षेत्रावर विशेष संशोधन प्रकल्प सुरू झाला आहे. सध्या आमच्याकडे ३५ जातिवंत जनावरे आहेत. ज्या पशुपालकांकडे हा जातिवंत गोवंश आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या गोठ्यामध्येही गोवंश संवर्धनास मदत करण्यात येत आहे. आम्ही कोकण कपिला गोवंश सांभाळणाऱ्या पशुपालकांचा गोपालन संघ स्थापन करीत आहोत. 

‘‘या माध्यमाधून एकाच वेळी विद्यापीठातील पशू संशोधन प्रक्षेत्र आणि पशुपालकांच्या गोठ्यातही समांतरपणे संशोधनाच्या नोंदी ठेवण्यात येतील. विद्यापीठातील तज्ज्ञ या पशुपालकांना जातिवंत गोवंश संगोपन आणि संवर्धनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. येत्या काळात पशुपालकांच्या माध्यमातून जातिवंत दुधाळ गोवंश कोकणातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविणार आहेत. विद्यापीठ प्रक्षेत्रावरील कोकण कपिला गाय सध्या प्रति दिन सात लिटर दूध देत आहे. साधारणपणे अडीच वर्षांत पहिले वेत दिल्याचीही नोंद आहे. कोकणातील भातशेतीतील नांगरट, चिखलणी, ओढकाम त्याचबरोबरीने दुधासाठीही हा गोवंश चांगला आहे,’’ असेही ते म्हणाले.

असा आहे कोकण कपिला गोवंश

 • कोकणातील उष्ण, दमट आणि अति पावसाच्या प्रदेशात, डोंगराळ भागात चरून पोषण आणि दूध उत्पादनाची क्षमता.
 • तपकिरी काळा किंवा पांढरा भुरा आणि मिश्र रंगांचा गोवंश.
 • लहान ते मध्यम आकार, घट्ट बांधा, सरासरी २५० ते ३०० किलो वजन.
 • डोके मध्यम. प्रथम लहान आकाराची शिंगे असतात, वाढीच्या टप्प्यात ही शिंगे नंतर मागे वळतात. चेहरा सरळ, कान मध्यम आकाराचे सरळ समांतर रेषेत असतात.
 • डोळा, खूर आणि शेपटीचा गोंडा काळ्या रंगाचा.
 • लहान ते मध्यम आकाराचे वशिंडे, मानेखाली लोंबणारी पोळ.
 • चांगली रोगप्रतिकारक शक्ती, काटक गोवंश. त्यामुळे रोगास बळी पडण्याचे अत्यल्प प्रमाण. जनावरे स्वभावाने शांत.
 • कोकणातील उपलब्ध गवत, भात 
 • पेंढ्यावर गुजराण करण्याची क्षमता. सरासरी प्रति दिन २.२५ लिटर दूध उत्पादन.
 • बैल काटक असल्याने शेती मशागत तसेच ओढकामास उपयुक्त.
   

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...