agriculture news in Marathi, kolhapur in brinjal per 10 kg 100 to 400 rupese | Agrowon

कोल्हापुरात वांगे दहा किलोस १०० ते ४०० रुपये
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 जानेवारी 2019

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात वांगी, ओली मिरची, घेवड्याचे दर समाधानकारक होते. वांग्यास दहा किलोस १०० ते ४०० रुपये दर होता. वांग्याची दररोज दीडशे ते दोनशे करंड्या आवक होती. टोमॅटोच्या आवकेत गेल्या सप्ताहाच्या तुलनेत घट होती. टोमॅटोची दररोज सातशे ते आठशे कॅरेट आवक होती. टोमॅटोस दहा किलोस १५० ते ३६० रुपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत टोमॅटोचा दर काहीसा वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ओली मिरचीची दीडशे ते दोनशे करंड्या आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस १८० ते ४०० रुपये दर होता. ढोबळी मिरचीची दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. 

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात वांगी, ओली मिरची, घेवड्याचे दर समाधानकारक होते. वांग्यास दहा किलोस १०० ते ४०० रुपये दर होता. वांग्याची दररोज दीडशे ते दोनशे करंड्या आवक होती. टोमॅटोच्या आवकेत गेल्या सप्ताहाच्या तुलनेत घट होती. टोमॅटोची दररोज सातशे ते आठशे कॅरेट आवक होती. टोमॅटोस दहा किलोस १५० ते ३६० रुपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत टोमॅटोचा दर काहीसा वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ओली मिरचीची दीडशे ते दोनशे करंड्या आवक होती. ओल्या मिरचीस दहा किलोस १८० ते ४०० रुपये दर होता. ढोबळी मिरचीची दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. 

ढोबळी मिरचीस दहा किलोस ७० ते ३२० रुपये दर मिळाला. गवारीच्या आवकेत घट होती. गवारीस दहा किलोस ४५० ते ५०० रुपये दर होता. गेल्या सप्ताहात जिल्हा व परिसरात सातत्याने थंडी होती. याचा परिणाम गवारीच्या आवकेवर झाला. यामुळे गवारीची आवक रोडावल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातून वरण्याची पन्नास ते शंभर पोती झाली. २०० ते ४०० रुपये दहा किलो इतका दर मिळाला. काकडीची साठ ते सत्तर करंड्या आवक झाली. काकडीस दहा किलोस ७० ते ३०० रुपये दर मिळाला. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या आवकेतही घट झाली. कोथिंबिरीची नऊ ते दहा हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा १००० ते २००० रुपये दर मिळाला. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात कोथिंबिरीचे दर सुमारे दहा टक्‍यांनी वधारले. मेथीची दररोज दहा ते पंधरा हजार पेंढ्या आवक होती. मेथीस शेकडा ३०० ते ६०० रुपये दर होता. पालक, पोकळा शेपूस शेकडा २०० ते ३०० रुपये दर होता. मका कणसाची दररोज दोन ते तीन हजार नगाची आवक झाली. मका कणसास शेकडा  १५० ते ५०० रुपये दर मिळाला.
 

इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
परभणीत शेवगा प्रतिक्विंटल ३००० ते ३५००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते २७५० रुपये अकोला ः...
नाशिकमध्ये वांगे प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३५०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन...
औरंगाबादेत द्राक्षाच्या आवकेत चढ-उतार;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात केळीची आवक वाढली, दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक वाढली असून, नवती...
नगरमध्ये चिंच प्रतिक्विंटल ७००० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
गुलटेकडी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत काकडीला प्रतिक्विंटल १५०० ते...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३५०० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी ३०० ते ५००० रुपये...पुण्यात १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो ...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते १३१००...सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची...