agriculture news in marathi, Kolhapur collects 15 lakh liters of milk | Agrowon

कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 जुलै 2018

कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या दूध बंद आंदोलनाला सोमवारी (ता. १६) जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्वच दूध संघांनी संकलन बंद ठेवल्याने कुठेच दुधाचे संकलन झाले नाही. पहाटेपासून गावोगावच्या गजबजणाऱ्या दूध संस्था शांत होत्या. अनेक ठिकाणी दुग्ध संस्थां सुरूही केल्या गेल्या नाहीत. जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक दूध संस्था आणि दूध संघांनी संकलन बंद ठेऊन आंदोलनात सहभाग दर्शविला.

कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या दूध बंद आंदोलनाला सोमवारी (ता. १६) जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्वच दूध संघांनी संकलन बंद ठेवल्याने कुठेच दुधाचे संकलन झाले नाही. पहाटेपासून गावोगावच्या गजबजणाऱ्या दूध संस्था शांत होत्या. अनेक ठिकाणी दुग्ध संस्थां सुरूही केल्या गेल्या नाहीत. जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक दूध संस्था आणि दूध संघांनी संकलन बंद ठेऊन आंदोलनात सहभाग दर्शविला.

सोमवारी दिवसभर हिंसक आंदोलन झाले नसले तरी रविवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी टॅंकर अडवून दुधाची वाहतूक बंद पाडली. यामुळे रात्रभर तणाव होता. सोमवारी सकाळी दुधाचे संकलनच झाले नसल्याने दूध अडविण्याच्या घटना घडल्या नाहीत. सुमारे पंधरा लाखांहून अधिक लिटर दुधाचे संकलन सोमवारी झाले नसल्याचे दूध संघांच्या प्रतिनिधींनी सांगितले. रविवारी सायंकाळी संकलीत झालेल्या गोकुळ दूध संघांचे टॅंकर सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात पुणे, मुंबईकडे रवाना करण्यात आले.

आजचा दिवस महत्त्वाचा
दूध दर आंदोलन बेमुदत आहे. यामुळे या आंदोलनाचा आजचा (मंगळवार)चा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. संघांनी स्वयंस्फूर्तीने दूध संकलन बंद ठेवल्याचे वादाचे प्रसंग घडले नाहीत. पण संघानी फक्त एक दिवस दूध बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. यामुळे अनेक दूध संघांनी मंगळवारी दूध संकलन बंद ठेवणार की, सुरू ठेवणार याबाबतचा निश्‍चित निर्णय सांगण्यास नकार दिला. यामुळे मंगळवारी संघांच्या भूमिकेवर आंदोलनाची तीव्रता ठरणार आहे. दरम्यान, शहरी भागातील नागरिकांनी संभाव्य दूध टंचाई लक्षात घेऊन पॅकबंद पिशव्यामधून येणाऱ्या दुधाचा जादा खरेदी करून ठेवली. शहरी भागातील नागरिकांना आज (मंगळवारी) दुधाची टंचाई भासण्याची शक्‍यता आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...