agriculture news in marathi, Kolhapur district to have 11 thousand 282 crore Credit Planning | Agrowon

कोल्हापूरसाठी ११,२८२ कोटींचा पतपुरवठा आराखडा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

कोल्हापूर : जिल्ह्यात पुढील वर्षासाठी ११ हजार २८२ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदा बॅंकांना २३१५ कोटी रुपये कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट बॅंकांनी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. या आराखड्याचे प्रकाशन श्री. सुभेदार यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

कोल्हापूर : जिल्ह्यात पुढील वर्षासाठी ११ हजार २८२ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदा बॅंकांना २३१५ कोटी रुपये कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट बॅंकांनी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. या आराखड्याचे प्रकाशन श्री. सुभेदार यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे, बॅंक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी बॅंकेचे जिल्हा प्रबंधक राहुल माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, नाबार्डचे कोल्हापूरचे सहायक प्रबंधक नंदू नाईक, कोल्हापूर मध्यवर्ती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे किशोर कुमार उपस्थित होते. 

बॅंक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री. माने म्हणाले, जिल्ह्यासाठी या वर्षी करण्यात आलेल्या ११ हजार २८२ कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये त्यापैकी प्राथमिक क्षेत्रासाठी ७६४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा एकूण १२ टक्क्यांनी या पतपुरठा आराखड्यात अग्रणी बॅंकेमार्फत वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी या आराखड्यात वाढ करण्यात येते, मात्र या वर्षी कृषी व बचत गटांची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी १२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. नाबार्डने दिलेल्या विशेष सूचनेनुसार आराखड्यात वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

कृषी उत्पादनाला मिळणारे चांगले दर तसेच ८० टक्के शेतकरी बॅंकिंग व्यवस्थेखाली आणणे व त्याला लागणाऱ्या संलग्न सेवासाठी २०१८-१९ या वर्षासाठी तब्बल ३ हजार ९३२ कोटी रुपये तरतूद केली आहे. याच कारणासाठी गेल्या वर्षी २०१७-१८ मध्ये ३४८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंत्र माग तसेच इतर लघू उद्योगांसाठी २४१९ कोटी तरतूद करण्यात आली आहे. इतर प्राथमिक क्षेत्रासाठी वाढ करून तब्बल १२९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार स्वयंसाह्यता बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५३० शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून, या शेतकऱ्यांना २ हजार ८३ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...