agriculture news in marathi, Kolhapur district in heavy Rain | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

कोल्हापूर ः कोल्हापूर शहरासह परिसराला शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने झोडपून काढले. दुपारी अडीचच्या दरम्यान आलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला. झाडे पडल्याने वाहनांचेही नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातही अनेक ठिकाणी हा पाऊस झाला.

कोल्हापूर ः कोल्हापूर शहरासह परिसराला शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने झोडपून काढले. दुपारी अडीचच्या दरम्यान आलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला. झाडे पडल्याने वाहनांचेही नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातही अनेक ठिकाणी हा पाऊस झाला.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात गुरुवारी (ता. २०) दुपारी चारच्या सुमारास झोडपून काढले. गडहिंग्लज, आजरा, पन्हाळा, करवीर तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक होता. सुमारे एक तासाच्या कालावधीत विविध ठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळे पाण्यासाठी तरसणाऱ्या खरीप पिकांना दिलासा मिळाला. पण काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने आगाप पेरणी केलेल्या सोयाबीनच्या काढणीत व्यत्यय आला.  

पन्हाळा परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने दिलासा मिळाला. पन्हाळा, आंबवडे, मिठारवाडी, कोतोली, पुनाळ, मजनाळ, बाजारभोगाव परिसराला सुमारे तासभर झोडपून काढले. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकरी सुखावला. कडक उन्हामुळे माळरानाची पिके माना टाकू लागली होती. ऊस शेतीला भेगा पडल्याने लोकांनी नदीवर विद्युतपंप बसवण्यास सुरवात केली होती. गेली दोन दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे ऊस, भात, जोंधळा, भुईमूग आदी पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  तुळशी खोऱ्यातील सावर्डे दुमालासह शिरोली, सडोली, मांडरे, चाफोडी, गर्जन, आरळे, घानवडे परिसरात सुमारे पाऊण तास पाऊस झाला. बोरपाडळेसह शहापूर, मिठारवाडी, आंबवडे, मोहरे, माले, काखे, परिसराला पावसाने गुरुवारी चांगलेच झोडपून काढले. ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याचा वारासह जोरदार पाऊस झाला.

इतर बातम्या
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
बांगलादेशातील रेशीम उद्योग...प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
म्हैसाळ उपसाचे मागणीअभावी काही पंप बंदसांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर...नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया...