agriculture news in marathi, Kolhapur district in strike | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात तणाव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 जुलै 2018

कोल्हापूर : आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या सकल मराठा समाजाने केलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती राहिली. शहरात ‘एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषात सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीने शहरातील दुकाने पटापट बंद झाली. दसरा चौकातून दुपारी बारा वाजता या फेरीस सुरवात झाली.

कोल्हापूर : आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या सकल मराठा समाजाने केलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती राहिली. शहरात ‘एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषात सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीने शहरातील दुकाने पटापट बंद झाली. दसरा चौकातून दुपारी बारा वाजता या फेरीस सुरवात झाली.

कोंडा ओळ, उमा टाॅकीज, टेंबे रोड, देवल क्लब, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड पापाची तिकटी या मार्गे ही फेरी काढण्यात आली.
दरम्यान, दसरा चौकात दिवसभर ठिय्या आंदोलन केले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर आदींसह मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात भाग घेतला. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी समाजाच्या नेत्यांनी दिला.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी बसवर दगडफेक तसेच टायरी जाळून रस्ते बंद करून निषेध करण्यात आला. दत्तवाड (ता. शिरोळ) जयसिंगपूर व इचलकरंजी येथे बसवर दगडफेक करण्यात आली आहे. शिरोळ कागल, बिद्री येथे रास्ता रोको करण्यात आला. बहुतांशी शाळांना सुटी देण्यात आली.

इतर बातम्या
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...