Agriculture News in Marathi, kolhapur Dudh Utpadak Sangh (Gokul) demand subsidy on milk, kolhapur district | Agrowon

गोकूळ व्यवस्थापनाचे मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ) बदनामी होत असल्याच्या निषेधार्थ गोकूळ व्यवस्थापनाच्या वतीने गुरुवारी (ता. 7) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध व जनजागृती मार्चा काढण्यात आला. शासनाने दुधासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी असली तरी पडद्यामागून मात्र आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन यानिमित्ताने करण्यात आले.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ) बदनामी होत असल्याच्या निषेधार्थ गोकूळ व्यवस्थापनाच्या वतीने गुरुवारी (ता. 7) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध व जनजागृती मार्चा काढण्यात आला. शासनाने दुधासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी असली तरी पडद्यामागून मात्र आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन यानिमित्ताने करण्यात आले.

या मोर्चासाठी प्रत्येक गावातून हजारो पुरुष व महिला सभासद उपस्थित होते. गोकूळमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी गोकूळवर मोर्चा काढून गोकूळच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. याला शह देण्यासाठी गोकूळचे संचालक व व्यवस्थापनाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

वैयक्तिक स्वार्थासाठी गोकूळची बदनामी खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी बहुतांशी वक्‍त्यांनी दिला. दुपारी एकच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चास सुरवात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, अध्यक्ष विश्‍वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, पी. एन. पाटील. आमदार सुरेश हळवणकर आदी उपस्थित होते.

गोकूळने आंतराष्ट्रीय स्तरावर आपली ख्याती पोचवली. या दूध संघावर साडेपाच लाख कुटुंबे अवलंबून आहेत. सुमारे बत्तीस योजनांद्वारे दूध उत्पादकांची सेवा या संघामार्फत करण्यात येते. असे असतानाही काही व्यक्ती मुद्दामहून या संघाच्या व्यवस्थापनाबाबत गैरसमज पसरवून संघाची बदनामी करीत आहेत. अनेक लोकांचा उदरनिर्वांह अवलंबून असणाऱ्या या संघाच्या कारभारावर शंका व्यक्त करीत आहेत. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे यावेळी श्री. महाडिक यांच्यासह विविध वक्‍यांनी नमूद केले.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...