कोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये दहा किलो

कोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये दहा किलो
कोल्हापुरात ढोबळी मिरची ५० ते ३०० रुपये दहा किलो

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची वाढलेली आवक कायम राहिली. टोमॅटोस दहा किलोस ३० ते १०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची दीड ते दोन हजार कॅरेट इतकी आवक झाली. ढोबळी मिरचीची दररोज चारशे ते पाचशे कॅरेट आवक होती. ढोबळ्या मिरचीस दहा किलोस ५० ते ३०० रुपये दर होता.

गवारीच्या आवकेत गेल्या सप्ताहाच्या तुलनेत घट होती. गवारीस दहा किलोस २०० ते ३५० रुपये दर मिळाला. ओला वटाण्याची दररोज दीडशे ते दोनशे पोती आवक होती. ओल्या वटाण्यास दहा किलोस २५० ते ४५० रुपये दर होता. भेंडीच्या आवकेतील वाढ या सप्ताहातही कायम असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. भेंडीची दररोज दीडशे ते दोनशे करंड्या आवक होती. भेंडीस दहा किलोस ५० ते ३७० रुपये दर होता.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या आवकेत या सप्तात वाढ पहावयास मिळाली. तब्बल पंचवीस ते तीस हजार पेंढ्या कोथिंबीर बाजार समितीत दाखल झाली. कोल्हापूर, सांगली बरोबर बेळगावातूनही या सप्ताहात कोथिंबिरीची आवक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ४०० रुपये दर मिळाला. मेथीच्या आवकेतही वाढ होती. मेथीस शेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा, शेपूस शेकडा ५०० ते १००० रुपये दर होता. डाळिंबाची दररोज ५० ते १०० कॅरेट आवक होती. डाळिंबास किलोस १५ ते ३५ रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com