agriculture news in marathi, Kolhapur Jaggery gets challenge from Uttar Pradesh | Agrowon

कोल्हापुरी गुळाला ‘यूपी’चे आव्हान
राजकुमार चौगुले
सोमवार, 25 डिसेंबर 2017

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात गुळाला चांगला दर मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली असतानाच अनपेक्षितपणे उत्तर प्रदेशातून गुजरात मार्केटमध्ये गुळाची जोरदार आवक सुरू झाली आहे. त्याचा फटका कोल्हापुरी गुळाला बसला आहे. उत्तर प्रदेशचा गूळ कोल्हापूरच्या तुलनेत स्वस्त पडत असल्याने गुजरातमधील व्यापाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील गुळाला पसंती दिली आहे. यामुळे कोल्हापुरी गुळाचा उठाव कमी होत आहे. याचा प्रतिकूल परिणाम गुळाच्या दरावर होत आहे. या परिस्थिीमुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत येथील गुळाचे दर क्विंटलला सरासरी तीनशे रुपयांनी घसरले आहेत. 

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात गुळाला चांगला दर मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली असतानाच अनपेक्षितपणे उत्तर प्रदेशातून गुजरात मार्केटमध्ये गुळाची जोरदार आवक सुरू झाली आहे. त्याचा फटका कोल्हापुरी गुळाला बसला आहे. उत्तर प्रदेशचा गूळ कोल्हापूरच्या तुलनेत स्वस्त पडत असल्याने गुजरातमधील व्यापाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील गुळाला पसंती दिली आहे. यामुळे कोल्हापुरी गुळाचा उठाव कमी होत आहे. याचा प्रतिकूल परिणाम गुळाच्या दरावर होत आहे. या परिस्थिीमुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत येथील गुळाचे दर क्विंटलला सरासरी तीनशे रुपयांनी घसरले आहेत. 

उत्पादनघटीचे अंदाज चुकले
कोल्हापुरात तयार होणाऱ्या गुळाची गुजरात ही मुख्य बाजारपेठ आहे. याशिवाय दक्षिणेकडील काही राज्यांतही या भागातील गूळ जातो. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरपर्यंत सर्वत्रच पावसाची परिस्थिती चांगली नव्हती. यामुळे ऊस उत्पादनात परिणामी गूळ निर्मितीतही घट होईल, असा अंदाज होता. परिणामी दरही गेल्या वर्षीपेक्षा चांगले राहतील, अशी शक्‍यता होती; पण परतीचा पाऊस महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही चांगला झाला. यामुळे शेवटच्या टप्प्यात उसाची चांगली वाढ झाली. तरीही गूळ उत्पादन कमी होईल या शक्‍यतेने यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन महिन्यांत व्यापाऱ्यांनी येथील गुळाची चांगली खरेदी केली. यामुळे गुळाचा दर ४००० ते ४५०० रुपयांपर्यंत गेला; परंतु नोव्हेंबरनंतर मात्र परिस्थिती बदलली. उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी उसाला चांगला दर न दिल्याने यंदा त्या भागात गुऱ्हाळे तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आणि अचानकपणे उत्तर प्रदेशातून गुजरातकडे येणाऱ्या गुळात वाढ झाली. कोल्हापुरातील आवकेतही वाढ झाली.

आवक पन्नास टक्क्‍यांनी वाढली
उत्तर प्रदेशातून गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाची आवक पन्नास टक्क्‍यांनी वाढली. वाहतूक खर्चाचा विचार करता तेथील व्यापाऱ्यांना उत्तर प्रदेशाचा गूळ स्वस्त पडत आहे. कोल्हापूरच्या तुलनेत वाहतूक खर्चात क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांची बचत होत असल्याने साहजिकच तेथील व्यापाऱ्यांनी उत्तर प्रदेशाच्या गुळाला पसंती दिल्याने कोल्हापुरातून गुजरातला गूळ पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांनी गुळाची खरेदी कमी केली. या सर्व घटनांचा परिणाम मात्र या भागातील गूळ उत्पादकांना सोसावा लागत असल्याचे चित्र आहे. 

शीतगृहासाठीची खरेदी मंदावली
व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी यंदा गुळाचे उत्पादन कमी होईल या अपेक्षेने गुजरातेत व्यापाऱ्यांनी शीतगृहात गूळ ठेवला होता. गेल्या हंगामाच्या शेवटी गुळाच्या दरात दहा टक्क्‍यांनी वाढ झाली. यामुळे चार हजार रुपयांपर्यंत दर देऊन गूळ खरेदी केला. आता त्याचा व्यवस्थापन खर्च पाच हजार रुपये प्रतिटनापर्यंत गेला आहे. यातच उत्तर प्रदेशचा गूळ स्वस्त पडत असल्याने अनेक व्यापारी तो खरेदी करत आहेत. हवा तेवढा गूळ मिळत असल्याने शीतगृहात ठेवलेला गूळ तसाच राहून त्याचे नुकसान व्यापाऱ्यांना सोसावे लागत आहे. परिणामी शीतगृहात ठेवण्यासाठीच्या गुळाची खरेदी मंदावली असल्याने त्याचा फटका दराला बसत आहे. 

प्रतिक्रिया...
यंदा गुळाचे दर चांगले राहतील या अपेक्षेने गूळ बाजार पहिल्या टप्प्यात तेजीत आला; परंतु अनाहूतपणे उत्तर प्रदेशातून गुजरातमध्ये गुळाची आवक वाढली. तशीच कोल्हापुरातूनही वाढली. यामुळे गूळ बाजाराची तेजी झपाट्याने कमी झाली. दुर्दैवाने याचा फटका उत्पादकांबरोबर अनेक व्यापाऱ्यांना बसला आहे. 
- निमेश वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर
.........................

इतर अॅग्रो विशेष
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...
माॅन्सून अंदमानात दाखल !!!पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...