agriculture news in marathi, kolhapur jaggery season in mid session, fifteen hundred bales incoming | Agrowon

कोल्हापुरात गूळ हंगाम मध्यावर १५ लाख रव्यांची आवक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात जानेवारीच्या शेवटच्या सप्ताहाअखेर गुळाची १५ लाख रव्यांची आवक झाली आहे. दरात मात्र विशेष सुधारणा झाली नाही. गुळास प्रतिक्विंटल २८०० ये ३८०० इतका दर कायम आहे. पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे.

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात जानेवारीच्या शेवटच्या सप्ताहाअखेर गुळाची १५ लाख रव्यांची आवक झाली आहे. दरात मात्र विशेष सुधारणा झाली नाही. गुळास प्रतिक्विंटल २८०० ये ३८०० इतका दर कायम आहे. पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे.

यदा हंगामाच्या प्रारंभी सातत्याने ४००० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. नोव्हेंबरनंतर मात्र गुळाच्या दरात घसरण सुरू झाली. डिसेंबरपर्यंत ३००० रुपये इतका दर खाली आला. आवकेत फार वाढ नसली तरी मागणीत सातत्य नसल्याने दर फारसे वाढले नाहीत. गुजरातच्या बाजारपेठेत उत्तर प्रदेशचा गूळ येऊ लागल्याने त्याचा फटका येथील गुळास बसत आहे. ती स्थिती अद्यापही कायम असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

सध्या गूळ हंगाम मध्यात आहे. अजून एक महिना गुऱ्हाळे चालू शकतील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलेनंत यंदाच्या आवकेचा अंदाज घेतल्यास सध्या गेल्या वर्षीइतकीच आवक सुरू असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. गुळाला सरासरी दर ३५०० रुपयांपर्यंत मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या गुळास ४००० रुपयांच्या वरही दर मिळत असला तरी अशा प्रकारचा गूळ बाजार समितीत येण्याचे प्रमाण कमी असल्याचे गूळ विभागाच्या सूत्रांनी सांगितले. आणखी पंधरा दिवस गुळाची आवक वाढलेली दिसेल. त्यानंतर आवकेत घट येण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

दर्जानुसार गुळास मिळणारा सरासरी दर असा (क्विंटल)

 दर्जा  दर
 स्पेशल  ४२००
 क्र १  ४०००
 क्र २  ३७००
 क्र ३  ३३००
 क्र ४  २९००
 

 

 

इतर अॅग्रोमनी
कांद्यातील नरमाई किती काळ?कां द्याच्या बाजारात जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८...
शेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...
सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कलएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा...
सरकारने साखर आयात केली नाही कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर...
दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लकजळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल...
गवार बी वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स...एनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात हळद, गहू व हरभरा...
पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक...चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि...
कशी रोखणार पुरवठावाढ?शेतीमाल पुरवठावाढ ( Supply glut) ही मोठी ...
साखरेचा बफर स्टॉक न केल्यास अडचणी...पुणे : देशातील साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे...
एमार कंपनी महाराष्ट्रात अन्न...मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची...
मक्याच्या भावात घसरणया सप्ताहात सर्वात अधिक घसरण गवार बी मध्ये (८.६...
तीन महिन्यांनंतर परतली तेजी; बाजार उसळलाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या...
डॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधीजळगाव : रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरचे दर ६६ रुपये...
चीनमध्ये सोयापेंड निर्यातीला संधीनवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक...
सरासरी मॉन्सूनमुळे २८.३ दशलक्ष टन...नवी दिल्ली : चांगल्या मॉन्सूनच्या हजेरीच्या...
मका वगळता सर्व पिकांच्या भावात वाढया सप्ताहात हळद, गहू व गवार बी यांच्यातील किरकोळ...
भारतीय कापसाची सर्वाधिक आयात...जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
आंबा निर्यातीला सुरवातपुणे  ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी...
पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदीचंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४....