agriculture news in Marathi, Kolhapur market in Close the jaggery deals | Agrowon

माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ सौदे बंद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम करण्यास नकार दिल्याने शाहू मार्केट यार्डातील गूळ सौदे (गुरुवारी) पुन्हा बंद पडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कारण काढून सौदे बंद पाडल्यास ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे यांनी दिला. तसेच, शाहू मार्केट यार्डात गूळ आवक जावक २४ तास सुरू ठेवावी, अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी शेती उत्पन्न बाजार समितीला दिले. 

कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम करण्यास नकार दिल्याने शाहू मार्केट यार्डातील गूळ सौदे (गुरुवारी) पुन्हा बंद पडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कारण काढून सौदे बंद पाडल्यास ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे यांनी दिला. तसेच, शाहू मार्केट यार्डात गूळ आवक जावक २४ तास सुरू ठेवावी, अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी शेती उत्पन्न बाजार समितीला दिले. 

यंदाचा गूळ हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारपेठेत गुळाची आवक मोठ्या प्रमाण झाली आहे. सौदेही सुरळीत सुरू होते. मात्र, बुधवारी सहा व्यापाऱ्यांकडे माथाडी कामगारांनी ठराविक कालावधीतच काम करण्याचा दुपारनंतर काम करण्यास नकार दिला. त्यामुळे गूळ रवे पडून राहिले. तिथे सौदे घेता येणे मुश्‍कील झाले. यावरून अडते, व्यापारी, माथाडी कामगार यांच्यात वादाला सुरवात झाली. तेव्हा सर्व दुकानांतील माथाडी कामगार सौदे काढले नाहीत. परिणामी, आवक जैसे थे राहिली त्यामुळे शेतकऱ्यांनी आमच्या गुळाचे सौदे काढा, असा आग्रह धरला. 

यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी सकाळी गूळ सौदे सुरू झाले. मात्र, काही वेळांत पुन्हा वेळेवरून वाद सुरू झाला. माथाडी कामगारांनी काम बंद केले. सर्व माथाडी सौदे स्थळावरून माथाडी कामगार युनियनच्या कार्यालयाकडे गेले तेथेच ते थांबून राहिले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. आमचे गूळ रवे सौद्याविना पडून आहेत. असे सांगत त्यांनी बाजार समितीत शेतकरी गेले. त्यांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटेही घटनास्थळी आले. सर्वांनी बाजार समितीचे सचिव मोहन सालपे यांची भेट घेऊन माथाडी कामगारांच्या कामाच्या वेळा निश्‍चित कराव्यात, तसेच आलेली गूळ रवे आवक उतरून घेणे व सौदे झाल्यानंतर गूळ उचलणे ही कामे माथाडी कामगारांकडून वेळेत करून घ्यावीत, यार्डात २४ तास गुळाची आवक जावक सुरू ठेवावी, अशा मागणीचे निवेदन दिले. 

या निवेदनावर बाजार समिती सभापती व संचालक मंडळासमोर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच माथाडींनी अचानकपणे काम बंद आंदोलन करू नये, अशा सूचना श्री. सालपे यांनीही माथाडी कामगारांना केल्या. मात्र, त्यांनी कोणाचे काही ऐकूण न घेता काम बंद आंदोलन केले. त्यानंतर सकाळी साडेदहानंतर गुळाचे सौदे होऊ शकले नाहीत.

इतर ताज्या घडामोडी
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...
पीकविम्याच्या नावाखाली भाजप सरकारकडून...मुंबई : शेतकऱ्यांकडून पीक कर्ज घेताना...
विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...मुंबई : नवनिर्वाचित गृहनिर्माणमंत्री...
सोयाबीन पीकविमाप्रश्‍नी शेतकरी संघर्ष...पुणे  ः गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात पाऊस न...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...