agriculture news in marathi, Kolhapur market committee will be formed Cold-house building on BOT basis | Agrowon

कोल्हापूर बाजार समिती करणार बीओटी तत्त्वावर शीतगृह उभारणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

कोल्हापूर : कोल्हापूर बाजारसमितीला स्वत: शीतगृह बांधणे शक्‍य नसल्याने अखेर समितीने शीतगृह भाडेतत्त्वावर बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खासगी व्यक्तींना तीस वर्षे भाडेतत्त्वावर यासाठी जागा देण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविल्या असल्या तरी फक्त दहा टक्के शेतमाल असावा इतकीच मर्यादा बाजार समितीने घातल्याने याविरोधात शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर बाजारसमितीला स्वत: शीतगृह बांधणे शक्‍य नसल्याने अखेर समितीने शीतगृह भाडेतत्त्वावर बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खासगी व्यक्तींना तीस वर्षे भाडेतत्त्वावर यासाठी जागा देण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविल्या असल्या तरी फक्त दहा टक्के शेतमाल असावा इतकीच मर्यादा बाजार समितीने घातल्याने याविरोधात शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

बाजार समितीला शक्‍य असतानाही स्वत: न बांधता ती बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर खासगी लोकांना देत आहे. यातही व्यापारी हिताचा विचार स्पष्टपणे दिसून येत असल्याचे समितीच्याच काही संचालकांचे मत आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतमालालाच प्राधान्य देणे अपेक्षित असताना केवळ दहा टक्केच शेतमालाची अट घातल्याने शीतगृहाचा फायदा कोणाला असा प्रश्‍न आहे.
निविदा स्वीकारण्यास सुरवात

विशेष करून गुळासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीत शीतगृह व्हावे म्हणून विविध पातळीवरून प्रयत्न झाले. पण राजकीय इच्छाशक्ती कोणाचीही नसल्याने तज्ज्ञांनी पहाणी करूनही हे काम रेंगाळले. पण सध्याची एकूण स्थिती पहाता बाजार समितीला स्वत: शीतगृह बांधणे शक्‍य नसल्याने बाजार समितीतच खासगी तत्त्वावर शीतगृह बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी नुकत्याच निविदा मागविण्यास सुरवात झाली आहे. आवारातील सतरा हजार चौरस फूट जागेत तीन हजार टन क्षमतेचे कोल्डस्टोअरेज बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या
आहेत.

फायदा शेतकऱ्यांचा की व्यापाऱ्यांचा?
तीस वर्षांच्या भाड्यावर कोणीही या परिसरात शीतगृह बांधू शकणार आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नापेक्षा संबंधितांसाठीच अटी शिथिल केल्या आहेत. बाजारसमितीत जर शीतगृह असेल तर इतर भागातूनही तो व्यक्ती सुमारे नव्वद टक्के इतर भागातील शेतमाल शीतगृहात ठेवू शकतो. पण समजा स्थानिक भागातील शेतकऱ्याने जादा भाडेतत्त्वावर शीतगृहात ठेवायचे ठरविले तर केवळ दहा टक्केची अट दाखवून संबंधित शीतगृह मालक त्याला निरुत्तर करू शकतो. यात शेतकरी हित किती साधणार हाही प्रश्‍न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...