agriculture news in Marathi, kolhapur pattern will be in satara district for sugarcane price, Maharashtra | Agrowon

साताऱ्यातही ऊस दराचा कोल्हापूर पॅटर्न
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सातारा  : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात एफआरपी अधिक दोनशे रुपयांचा ऊसदराचा पॅटर्न सर्वानुमते मान्य करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सोडविण्यात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची मध्यस्थी यशस्वी ठरली. 

सातारा  : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात एफआरपी अधिक दोनशे रुपयांचा ऊसदराचा पॅटर्न सर्वानुमते मान्य करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सोडविण्यात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची मध्यस्थी यशस्वी ठरली. 

सातारा जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सोमवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्यासह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व साखर कारखान्यांचे प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस फलटण शुगर, शरयु, स्वराज शुगर, ग्रीन पॉवर, रयत या पाच कारखान्यांच्या प्रतिनिधींनी दांडी मारली. 

बैठकीत सुरवातीला अजिंक्‍यतारा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी कोल्हापूरप्रमाणे आम्ही एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्यास तयार आहोत असे सांगून ऊस दराची कोंडी फोडली. त्यानंतर सह्याद्री, खंडाळा, प्रतापगड, किसन वीर, श्रीराम, जरंडेश्‍वर, जयवंत शुगर, कृष्णा या कारखान्यांनी एक एक करत कोल्हापूर पॅटर्नला मान्यता दिली.

पण देसाई कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी संचालक मंडळाला विचारून दर निश्‍चित करतो, असे सांगितले. त्यावर शेतकरी संघटनांचे पदाधिकारी संतप्त झाले. तुम्ही दराबाबत भूमिका स्पष्ट करणार नसाल तर बैठकीला कशाला आलात. असा सवाल सर्वांनी केला. त्यामुळे कार्यकारी संचालकांनी बाहेर जाऊन थेट आमदार शंभूराज देसाईंशी संपर्क साधला. त्यांनी कोल्हापूर पॅटर्नला मान्यता दिली. त्यानंतर बैठकीत कार्यकारी संचालकांनी आम्हाला दर मान्य असल्याचे सांगितले. त्यांचेही सर्व पदाधिकाऱ्यांनी टाळ्यावाजवून स्वागत केले.

ऊस दराचा प्रश्‍न सुटल्यानंतर बैठकीस गैरहजर राहिलेल्या पाच कारखान्यांना एकवेळ संधी देऊ या. त्यातूनही त्यांनी दर जाहीर केला नाहीतर साखर आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी घेतला. यानंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध प्रश्‍न मांडले. बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन नलवडे, अर्जून साळुंखे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, शंकर शिंदे, अनिल पवार, विकास पाटील, धनंजय महामुलकर, रयत क्रांती संघटनेचे संजय भगत, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...